ETV Bharat / entertainment

मराठमोळी 'बोल्ड अँड ब्यूटी' तेजस्वी प्रकाश आहे उत्तम गायिका - पाहा व्हिडिओ - Tejashwi Prakash New Song

मराठमोळी अभिनेत्री व बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश ही सौंदर्यवान तर आहेच पण ब्यूटी विथ ब्रेन आहे. तिच्याकडे अनेक प्रतिक्षा भरलेल्या आहेत. नागिन या मालिकेतून आपण तिला अभिनय करताना पाहिले असेलच पण ती उत्तम गायिकाही आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केलाय यात ती गाताना दिसते.

तेजस्वी प्रकाश
तेजस्वी प्रकाश
author img

By

Published : Aug 10, 2022, 5:06 PM IST

मुंबई - अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ( Tejasswi Prakash ) ही एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे. बिग बॉस 15 ची विजेती ठरलेली तेजस्वी ही एक मराठमोळी मुलगी आहे हे अनेकांना माहितच नव्हते. टेलिव्हिजन शोमध्ये तिच्या अभिनयाने लाखो मने जिंकणारी तेजस्वी आता मराठी चित्रपटात झळकणार म्हटल्यानंतर बऱ्याच जाणांच्या भुवया उंचावल्या.

तिचे संपूर्ण नाव तेजस्वी प्रकाश वायंगणकर असे आहे. तिचा जन्म मराठी भाषिक संगीतमय कुटुंबात झाला. ती शिक्षणाने इंजिनियर आहे. तिने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली.तेजस्वी प्रकाशचे इन्स्टाग्राम तिच्या सुंदर फोटोशूट आणि व्हिडिओने सजलेले आहे. ती सौंदर्यवान तर आहेच पण ब्यूटी विथ ब्रेन आहे. तिच्याकडे अनेक प्रतिक्षा भरलेल्या आहेत. नागिन या मालिकेतून आपण तिला अभिनय करताना पाहिले असेलच पण ती उत्तम गायिकाही आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केलाय यात ती गाताना दिसते.

तेजस्वी प्रकाशने गायलेले गाणेही खूप सुंदर आहे. लता मंगेशकर यांनी गायलेले ना जिया लागे ना हे गाणे तिने निवडण्याचे धाडस केले व उत्तम रितीने ते निभावल्याचेही दिसत आहे. राजेश खन्ना अमिताभ बच्चन, सुमिता सन्याल, रमेश देव यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या आनंद चित्रपटातील ना जिया लागे ना हे गाणे तेजस्वीने उत्तम गायले आहे.

अलिकडेच तेजस्वीने सोशल मीडियावर तिचा पहिला मराठी चित्रपट मन 'कस्तुरी रे' ( Man Kasturi Re ) चे पोस्टर शेअर केले होते. या चित्रपटात ती दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनेता अभिनय बेर्डेसोबत ( Abhinay Berde ) स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

'मन कस्तुरी रे' चे दिग्दर्शन संकेत माने ( Sanket Mane ) करत आहे. यापूर्वी त्यांनी खारी बिस्किट (2019) आणि परी हूं मैं (2018) सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. हा चित्रपट एक प्रेमकथा आहे ज्यात तेजस्वीने श्रुती नावाच्या तरुणीची भूमिका केली आहे. मुंबईवर आधारित हा चित्रपट नवीन काळातील रोमँटिक ड्रामा आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

'मन कस्तुरी रे' नंतर, तेजस्वीचा आणखी एक मराठी चित्रपट पाइपलाइनमध्ये आहे. रोहित शेट्टीची निर्मिती असलेला विहान सूर्यवंशी दिग्दर्शित दिग्दर्शित 'स्कूल कॉलेज आणि लाइफ'मध्ये अभिनेत्री तेजस्वी दिसणार आहे. या चित्रपटात तेजस्वी करण किशोर परबसोबत दिसणार आहे. दरम्यान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी तिच्या बहुचर्चित टेलिव्हिजन शो नागिन 6 मध्ये भूमिका साकारत आहे

हेही वाचा - राजू श्रीवास्तव प्रमाणेच जिममध्ये ह्रदयविकाराचा झटका आलेले फिटनेस फ्रिक सेलेब्रिटी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.