ETV Bharat / entertainment

Ankita Lokhande broke silence : सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअपच्या विषयावर अंकिता लोखंडेनं सोडलं मौन - Ankita Lokhande breakup

Ankita Lokhande broke silence : माजी प्रियकर आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप का झाले याचा खुलासा अंकिता लोखंडेनं बिग बॉसच्या घरात केला आहे. या विषयावर उघडपणे ती पहिल्यांदाच बोलली आहे. दोघे कसे वेगळे झाले याचाही खुलासा करताना ती म्हणाली की, त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दलचं प्रेम दिसणं बंद झालं होतं. तो अचानक माझ्या जीवनातून निघून गेला. त्यानं अखेरपर्यंत मला कारण सांगितलं नाही.

Ankita Lokhande broke silence
अंकिता लोखंडेनं सोडलं मौन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 11:07 AM IST

मुंबई - Ankita Lokhande broke silence : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेचं प्रेमप्रकरण खूप काळ चर्चेचा विषय ठरलं होतं. त्यानंतर ते विभक्त झाले आणि सुशांतच्या इतर प्रेमप्रकरणांना सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या त्याच्या मनाला चटका लावणाऱ्या मृत्यूनं मनोरंजन जगत हळहळलं. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत सध्या बिग बॉस 17 या वादग्रस्त शोमध्ये स्पर्धक म्हणून आली आहे. घरात पोहोचल्यापासून दोघांच्यामध्ये बऱ्याचवेळा खटके उडल्याचं दिसून आलंय. या पार्श्वभूमीवर अंकितानं सुशांत सिंह राजपूतपासून का विभक्त झालो किंवा त्यांच्या ब्रेकअपमागे काय कारण होतं यावर पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलंय. बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच अंकिताने सुशांतसोबतच्या नात्यावर मौन सोडले आहे.

अंकिताला सुशांत सिंह राजपूतची आठवण का आली? - बिग बॉस 17 च्या घरात कंगना राणौतच्या रिएालिटी शो 'लॉक अप'च्या पहिल्या सीझनचा विजेता आणि कॉमेडियन मुन्नावर फारुकी देखील स्पर्धक म्हणून आहे. अंकिता घरी मुन्नावरशी बोलताना सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत रमली.

अंकिताने पुढे सांगितलं की, 'सात वर्षे डेट केल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. अंकिता म्हणाली, एके रात्री तो अचानक गायब झाला, त्याला यश मिळाल्यावर लोक त्याचे कान भरू लागले. त्यावेळी आमच्यात प्रेम उरले नव्हते, मी जेव्हा जेव्हा सुशांतच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा मला पूर्वीसारखे प्रेम दिसलं नाही. मला ब्रेकअपबद्दल काही स्पष्टीकरणही दिले नाही, तो माझ्यापासून का वेगळा झाला हेही सांगितले नाही, तो माझ्या संपर्कात होता, पण कधीच त्यानं कारण सांगितले नाही.'

सुशांत सिंहसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडे पूर्णपणे तुटली होती. 14 जून 2020 रोजी सुशांतच्या मृत्यूनंतर तिलाही मोठा धक्का बसला होता. पण कालांतराने अंकिताने स्वत:ला सांभाळलं आणि बिझनेसमन विकी जैनच्या रुपानं तिला एक नवीन मित्र सापडला. आता ती त्याच्यासोबत तिचे सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. अंकिता तिचा पती विकीसोबत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

हेही वाचा -

1. Urfi Javed Receives Death Threat : उर्फी जावेदला जीवे मारण्याची मिळाली धमकी ; शेअर केली पोस्ट

2. Kennedy received a standing ovation : 'मामी'मध्ये सनी लिओनीच्या 'केनेडी'ला मिळाले स्टँडिंग ओव्हेशन!

3. Fighter Last Shoot : हृतिक रोशन स्टारर 'फायटर' चित्रपटाचं शूटिंग लवकरच होणार पूर्ण...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.