ETV Bharat / entertainment

Rama Raghav Series : 'रमा राघव' मालिकेतील ऐश्वर्या आणि निखिल यांचे 'तू तू मैं मैं' आणि 'बाँडींग'! - टॉम अँड जेरी

कलर्स मराठीवर सुरु असलेली रमा राघव ही मालिका वेगळा विषय असल्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. रमा आणि राघव यांच्यातील स्वभाव वैशिष्ठ्यामुळे मालिकेची रंजकता वाढत आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Mar 27, 2023, 7:42 PM IST

मुंबई - मराठी मालिकांचे एक वेगळे विश्व आहे. याचा प्रेक्षक त्याला आवडणाऱ्या मालिकेशी नेहमीच प्रामाणिक राहतो. परंतु जेव्हा मालिका रटाळ होऊ लागते तेव्हा तो हक्काने त्याबद्दल व्यक्त होत असतो. मराठी मालिकासुद्धा वेगळे विषय मांडत असताना चाकोरीबाहेर काहीतरी वेगळं दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. कलर्स मराठीवर सुरू असलेली रमा-राघव या मालिकेतसुद्धा वेगळा विषय मांडला जात असल्यामुळे ती प्रेक्षकांना भावतेय. कुठलेही तरुण जोडपे वागेल तसे ते वागतात म्हणजेच त्यांची लुटूपुटूची भांडणं, क्षुल्लक कारणांमुळे घडणारे रुसवे फुगवे, आपलाच शब्द खरा करताना होणारी तू तू मैं मैं अशा गोष्टी घडूनसुद्धा त्यांच्या प्रेमातील गोडवा दिसून येतो आणि त्यांच्यातील केमिस्ट्री सर्वांना आवडून जातेय.

रमा, दोघांमध्ये लहान असल्यामुळे, तिचा खट्याळपणा उभारून येताना दिसतो. तसेच तिचा मानभावीपणा आणि अवखळपणा तिच्या व्यक्तिरेखेला खुलवतात. तिचा स्वभाव तसा हळवा असल्यामुळे तिच्यातील निरागसपणा उठून दिसतो. तिच्याविरुद्ध राघव आहे. राघव समंजस, संयमी, शांत स्वभावाचा असल्यामुळे त्या दोघांच्या नात्यातील प्रेम टिकून राहते. त्याचाही स्वभाव लाघवी आहे. त्यामुळे तो प्रेक्षकांना आपलासा वाटतो. भिन्न स्वभाववैशिष्ठ्ये असलेला रमा राघव यांचा जोडा मालिकेतील मनोरंजकता वाढवत ठेवतो.

ही झाली पडद्यावरील स्वभाववैशिष्ठे. परंतु रमा आणि राघव यांच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचे स्वभावही मालिकेतील पात्रांच्या जवळपास जाणारे आहेत. ऐश्वर्या शेटे आणि निखिल दामले यांच्यातील मैत्री त्यांना पडद्यावरील पात्रे साकारताना मदत करते. ऐश्वर्या आणि निखिल ही जोडी पडद्यामागे देखील धमाल मस्ती करताना दिसते. त्यांचे रुसवे फुगवे आणि लगेचच होणारी 'मांडवली' सेटवरील सर्वांचे मनोरंजन करीत असते. रमा माधवच्या युनिटने त्यांना एक नाव दिलं आहे आणि ते म्हणजे 'टॉम अँड जेरी'.

अभिनेत्री ऐश्वर्या म्हणाली, माझी आणि निखिलची दोस्ती आहे. परंतु आम्ही एकमेकांवर प्रँकस करीत असतो. आमचं शूट पालीला होतं तेव्हा मला त्याची गंमत करावीशी वाटली. मी त्याचा हॉटेलमधील खोलीचा दरवाजा वाजवायचे आणि लपायचे. तो दार उघडून उघडून वैतागला होता. जेव्हा मी हे केलं असं कळल्यावर माझ्यावर चिडलादेखील. परंतु ते क्षणिक होतं. नंतर एका सीनचे शूटिंग करताना मला एका पाण्याच्या कुंडात पडायचे होते, तेव्हा त्याने माझी खूप मदत केली आणि मला काही इजा होणार नाही किंवा त्रास होणार नाही याची काळजी घेतली. मालिकेत भांडताना मजा येतेच तशी ऑफ स्क्रीन भांडतानाही येते. परंतु आमचं छान बाँडींग झालंय आणि त्यामुळे त्याचा सीन्स मध्ये उपयोग होतोय.

हेही वाचा - Deepika And Ranveer Singh : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने स्पोर्ट्स इव्हेन्टमध्ये भाग घेऊन ट्रोलर्सची तोंडे केली बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.