ETV Bharat / entertainment

‘तू तेव्हा तशी’ मधील उज्वला जोग म्हणाल्या, ‘स्क्रिप्ट वाचताना देखील मला असं वाटतं की हे पात्र किती माझ्यासारखंच आहे’!

author img

By

Published : Jun 5, 2022, 1:50 PM IST

माई-मावशी ची भूमिका अभिनेत्री उज्वला जोग अगदी चोख निभावत आहेत. उज्वला जोग यांना अभिनय क्षेत्रात लाली मावशी या नावाने ओळखलं जातं. त्यांना माई मावशी या व्यक्तिरेखेसाठी खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. या बद्दल बोलताना लाली मावशी म्हणाल्या, "प्रत्येक घरात माई मावशीसारखं एक व्यक्तिमत्व हे असतंच आणि असलंच पाहिजे असं मला वाटतं.

actress ujwala jog on role of mai mavshi
तू तेव्हा तशी’ मधील उज्वला जोग

मुंबई - चिंगी, झेंडा, पावनखिंड सारख्या चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सध्या तू तेव्हा तशी या मालिकेतून प्रेक्षकांना रिझवताहेत. या मालिकेत त्या माई-मावशी हे पात्र साकारत असून प्रेक्षकांना ते खूप भावतेय. झी मराठीवरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली तू तेव्हा तशी ही मालिका प्रेक्षकांच्या मनाला भिडतेय. या मालिकेतील स्वप्नील जोशी साकारतोय ते पात्र सौरभ आणि त्याची माई मावशी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडतेय. आपल्या घरी पण एक माई मावशी असावी असं प्रेक्षकांना मालिका पाहताना जाणवतं.

अभिनय क्षेत्रात लाली मावशी या नावाने ओळखलं जातं - माई-मावशी ची भूमिका अभिनेत्री उज्वला जोग अगदी चोख निभावत आहेत. उज्वला जोग यांना अभिनय क्षेत्रात लाली मावशी या नावाने ओळखलं जातं. त्यांना माई मावशी या व्यक्तिरेखेसाठी खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. या बद्दल बोलताना लाली मावशी म्हणाल्या, "प्रत्येक घरात माई मावशीसारखं एक व्यक्तिमत्व हे असतंच आणि असलंच पाहिजे असं मला वाटतं. वेगवेगळ्या नात्याच्या रूपात प्रत्येकाच्या आयुष्यात एक माई मावशी सारखी कोणीतरी असते मग ती आई, काकी, आत्या किंवा शेजारची काकू देखील असू शकते. ही व्यक्तिरेखाच इतकीच गोड आहे कि मला प्रेक्षकांकडून याबद्दल व्यक्तिरेखेसाठी खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.”

मी देखील खऱ्या आयुष्यात तशीच आहे - माई-मावशी म्हणजे लाली मावशी म्हणजेच उज्वला जोग पुढे म्हणाल्या, “मला अनेक प्रेक्षक त्यांच्या प्रतिक्रियांद्वारे सांगतात की त्यांना माई मावशी खूप आवडतेय. माई मावशी आणि लाली मावशी मध्ये साम्य देखील आहे. माई मावशीही थोडीशी फटकळ असली तरी ती सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे. तिचा धाक आहे पण ती तेवढीच प्रेमळ पण आहे. मी देखील खऱ्या आयुष्यात तशीच आहे. त्यामुळे माई मावशी साकारताना मला मी जशी खरी आहे तेच मला साकारायचं असतं. कधी कधी स्क्रिप्ट वाचताना देखील मला असं वाटतं की हे पात्र किती माझ्यासारखंच आहे."

‘तू तेव्हा तशी‘ ही मालिका प्रसारित होत आहे सोम ते शनी रात्री ८ वाजता झी मराठीवर.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.