हैदराबाद - अभिनेत्री नित्या मेनन ही लवकरच मल्याळम अभिनेत्यासोबत विवाह करणार असल्याच्या बातम्या मनोरंजन जगतात फिरत आहेत. याबद्दल नित्याला विचारले असता तिने या बातम्या अफवा असल्याचे म्हटले आहे. मल्याळम वृत्तपत्राशी बोलताना नित्या म्हणाली, “सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांमध्ये अजिबात तथ्य नाही. अशा बातम्या प्रकाशित करण्यापूर्वी माध्यमांनी सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न करावा अशी माझी इच्छा आहे.”
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
नित्या मेनन अलीकडेच मॉडर्न लव्हः हैदराबादमध्ये दिसली होती. तिने नागेश कुकुनूर दिग्दर्शित माय अनलिक्ली पॅन्डेमिक ड्रीम पार्टनर या लघुपटात रेवतीसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली आहे. आता नित्या आगामी 19(1)(a) चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहे. या चित्रपटैातून ती विजय सेतुपतीसोबत मल्याळम चित्रपट उद्योगात मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे. मंगळवारी त्याचा टीझर रिलीज झाला. 19(1)(a) हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार वर थेट रिलीज होईल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नित्या मेननकडे तमिळ चित्रपट थिरुचित्रंबलम देखील आहे, यात ती सुपरस्टार धनुषसोबत काम करीत आहे.
हेही वाचा - विजय देवराकोंडाचा जबरदस्त बहुप्रतीक्षित 'लायगर'चा ट्रेलर अखेर रिलीज