मुंबई - अभिनेत्री दलजीत कौरचा विवाह सध्या बिग बॉसमध्ये असणाऱ्या शालीन भनौतशी झाला होता. त्यांना नऊ वर्षाचा जेडॉन हा मुलगाही आहे. मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही आणि ते विभक्त झाले. दलजीत काही दिवसापासून यूकेमध्ये राहणाऱ्या निखिल पटेलसोबत प्रेमात आहे. आता ती लवकरच त्याच्यासोबत बोहल्यावर चढण्याची तयारी करत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
निखिल पटेल हा गेल्या वर्षी दुबईत दलजीतला पहिल्यांदा भेटला होता. तो फायनान्स कंपनीत काम करत असतो. दोघेही एका समारंभात पहिल्यांदा भेटले. दोघांची ओळख झाली व एकमेकांची सुख दुःख त्यांनी शेअर केले. त्यावेळी दलजीतने आपण घटस्फोटीत असल्याचे सांगितले व एक मुलगा असल्याचेही सांगितले. यावर समदुःखी असलेल्या निखीलनेही आपला घटस्फोट झाल्याचे व दोन मुलींचा बाप असल्याचे सांगितले. दोघेही आपल्या लेकरांबद्दल अभिमान बाळगून होते. निखीलला 13 वर्षांची आरियाना आणि आठ वर्षांची अनिका या दोन मुली आहेत. अनिका अमेरिकेत तिच्या आईसोबत राहते आणि तर आरियाना आपल्यासोबत राहत असल्याचेही निखीलने दलजीतला सांगितले होते. त्यांची ही भेट पुढे एकमेकांना कायमचा साथ देण्यासाठी महत्त्वाची ठरली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
वर्षभर संपर्कात राहिल्यानंतर निखील आणि दलजीत कौरने विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात मार्चमध्ये ते विवाह करणार आहेत. सध्या निखील आफ्रिकेतील नैरोबी येथे कामानिमित्य राहात असून तिथेच दोघेही आपला नवा संसार सुरू करतील. त्यानंतर निखीलचे जन्मस्थान असलेल्या लंडनमध्ये उर्वरीत आयुष्य घालवतील.