ETV Bharat / entertainment

अभिनेता निखिल चव्हाण ‘छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार २०२२’ ने सन्मानित!

टेलिव्हिजन मालिका आणि चित्रपटातील वेधक आणि मुख्य भूमिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला चार्मिंग चेहरा म्हणजे निखिल चव्हाण होय. संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय “छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार २०२२” सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल सिनेअभिनेता निखिल चव्हाण यांस जाहीर करण्यात आलेला आहे.

छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार २०२२

author img

By

Published : May 17, 2022, 11:53 AM IST

प्रत्येक कलाकाराला त्याच्या कलाकुसरीबद्दल शाबासकी मिळावी असे मनोमन वाटतंच असते. कुठल्याही कलाकाराचा प्रवास साधा सरळ सोपा असा कधीच नसतो. परंतु त्याला पुरस्कार मिळतो तो क्षण महत्वाचा असतो. टेलिव्हिजन मालिका आणि चित्रपटातील वेधक आणि मुख्य भूमिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला चार्मिंग चेहरा म्हणजे निखिल चव्हाण होय. संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय “छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार २०२२” सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल सिनेअभिनेता निखिल चव्हाण यांस जाहीर करण्यात आलेला आहे.

अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या निखिलचा नाटक, मालिका, चित्रपट, वेबीसिरीज असा वाढतच जाणारा अभिनयकौशल्याचा आलेख वाखाणण्याजोगा आहे. तसेच आजवर निखिललासुद्धा अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं. त्याची धडपड, शिकण्याची उर्मीच त्याला आज कामी आली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती सोहळ्यानिमित्त शनिवार दिनांक १४ मे २०२२ ला पुरंदर किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात युवराज शहाजीराजे संभाजीराजे भोसले, खा.सुप्रिया सुळे, महाराष्ट्र राज्यमंत्री विश्वजित कदम, आ. रोहित पवार, आ.संजय जगताप, मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते या पुरस्काराने निखिलला सन्मानित करण्यात आले.

यावेळी विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आजवर सिनेक्षेत्रात या पुरस्काराचे मानकरी दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते अमोल कोल्हे, अभिनेते भरत जाधव, अभिनेते अंकुश चौधरी, अभिनेते अशोक समर्थ हे ठरले होते, यंदा या मानकऱ्यांच्या यादीत अभिनेता निखिल चव्हाणने स्थान मिळविले आहे.

याबाबत बोलताना निखिल असे म्हणाला की, याआधी दिग्गज सिनेअभिनेते-दिग्दर्शक या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. मी माझी बरोबरी अर्थात त्यांच्याबरोबर नाही करू शकत. मात्र त्यांच्या बरोबरीने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी कायमच लक्षणीय असेल. माझे कुटुंब, माझे चाहते आणि प्रेक्षकांचा मी कायम ऋणी असेन कारण आज त्यांच्यामुळे मी आहे असे मला वाटते. या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी संबंध मान्यवरांचा आभारी आहे."

निखिल पुढे म्हणाला की, "अभिनयक्षेत्रात आजवर केलेल्या कामगिरीची याहून चांगली पोचपावती असूच शकत नाही, कारण ‘छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार २०२२’ हा यंदाचा राज्यस्तरीय पुरस्काराचा मानकरी मी ठरलो आणि हा पुरस्कार मला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी म्हणजेच पुरंदर किल्ल्यावर मिळाला आहे. किल्ल्यावर पुरस्कार मिळणे ही फार मोठी गोष्ट आहे, कारण महाराजांचे किल्ले आपल्यासाठी आदरणीय आहेत असे मला वाटते. अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटतेय ती म्हणजे, हा गडकिल्ला इंडियन डिफेन्सच्या हातात आहे. त्या गडकिल्ल्यावर हा पुरस्कार मला मिळाला ही नक्कीच माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. खरंच भरून पावलो.”

हेही वाचा - विकी कौशलच्या न्यूयॉर्कमधील वाढदिवसाची झलक पाहा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.