ETV Bharat / entertainment

Bigg Boss OTT 2 finale : अंतिम फेरीपूर्वी अभिषेक मल्हान रुग्णालयात दाखल, चाहत्यांची काळजी वाढली

बिग बॉस ओटीटी सिझन २ च्या फिनालेची उलटी गिनती सुरू झालेली असताना यातील आघाडीचा स्पर्धक अभिषेक मल्हान आजारी पडला आहे. आज रात्री होणाऱ्या फिनालेमध्ये तो परफॉर्म करणार की नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.

Bigg Boss OTT  2 finale
अभिषेक मल्हान रुग्णालयात दाखल
author img

By

Published : Aug 14, 2023, 2:31 PM IST

मुंबई - 'बिग बॉस ओटीटी सिझन २' चा सर्वात स्ट्राँग स्पर्धक अभिषेक मल्हान ग्रँड फिनालेच्या एक दिवस आधी रुग्णालयात भरती झाला आहे. या अनपेक्षित ट्विस्टने शोच्या क्लायमॅक्सवर काय परिणाम होतो हे पाहावे लागणार आहे. यामुळे अभिषेक मल्हानचे चाहते काळजी करत आहेत.

अंतिम फेरीच्या आदल्या दिवशी अभिषेकची बहीण, प्रेरणा मल्हान हिने सोशल मीडियावर आपला भाऊ रुग्णालयात असल्याचे त्याच्या चाहत्यांना ट्विटरवर कळवले आहे. सोमवारी रात्री होणाऱ्या फिनालेमध्ये तो असणार नाही याची यामुळे खात्री झाली आहे. १३ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या ट्विटरनंतर अभिषेक मल्हानचे चाहते तो बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

  • Just got to know abhishek is quite unwell and probably admitted in the hospital.
    So, he won’t be able to perform for y’all tonight.
    He has entertained us thoroughly through and through the season.
    Let’s pray for his speedy recovery. ❤️

    — Prerna Malhan (@HubWanderers) August 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अभिषेकची बहिण प्रेरणा मल्हान हिने सांगितले की, 'अभिषेकची तब्येत बरी नाही आणि तो हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. त्यामुळे, तो आज रात्री तुमच्यासाठी परफॉर्म करू शकणार नाही. त्याने संपूर्ण सीझनमध्ये आपले भरपूर मनोरंजन केले आहे. तो लवकर लवकर बाहेर येण्यासाठी प्रार्थना करूया.'

अभिषेक मल्हानची तब्येत बिघडल्याच्या घोषणेने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तो लवकर बरा व्हावा यासाठी त्याला ट्विटरवर प्रचंड सदिच्छा पाठवल्या जात आहेत. या अनपेक्षित घटनेने चाहते नाराज झाले आहेत. फिनालेमध्ये तो दिसणार नाही ही कल्पनाच अनेकांना सहन होत नाहीय. तो बरे होण्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार त्याची तब्येत बिघडल्याने त्याला डॉक्टरकडे नेण्यात आले होते. त्याला व्हायरल ताप आणि अंगदुखीचा त्रास असल्याचे समजते. आता त्याची तब्येत बरी असून तो फिनालेमध्ये झळकेल अशाही बातम्या आहेत.

अभिषेक मल्हान रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी सुमारे एक आठवडा आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त होता. तरीसुद्धा, अधिकृत बिग बॉस ओटीटी टीमने अद्याप त्याच्या प्रकृतीबद्दल कोणतेही अपडेट शेअर केलेले नाही. आजवरच्या त्याच्या कामगिरीमुळे अभिषेक मल्हान बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनमध्ये टॉप स्पर्धकांपैकी एक आहे.

बिग बॉस ओटीटी २ ट्रॉफीसाठी त्याच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये एल्विश यादव, मनीषा राणी, पूजा भट्ट आणि बेबीका धुर्वे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, बिग बॉसच्या घरातून नुकतीच बाहेर पडलेली जिया शंकर हिने अभिषेकच्या प्रवासाला पाठिंबा दिला आहे.

बिग बॉस ओटीटीचा नवीन सिझन १७ जून रोजी सुरू झाला, ज्यामध्ये सायरस ब्रोचा, आलिया सिद्दीकी, फलक नाझ, अविनाश सचदेव आणि जाद हदीद यांसारख्ये सेलेब्रिटी घरात दाखल झाले. काही नवीन आले तर काही बाहेर पडले. आता अंतिम सामना टॉप पाचमध्ये रंगणार आहे. ग्रँड फिनालेचा हा शो सोमवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता जिओ सिनेमावर प्रसारित होणार आहे.

हेही वाचा -

१. OMG 2 box office collection day 3 : 'ओ माय गॉड २' चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन तीन दिवसात ५० कोटीच्या जवळ पोहचले

२. Jailer box office collection Day 4 : 'जेलर' चित्रपट चौथ्या दिवशी १५० कोटीच्या उंबरठ्यावर

३. Chaleya Teri Aur : 'जवान'मधील नवीन 'छलेया तेरी ओर' गाण्यावर शाहरुखचा नयनतारासोबत रोमान्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.