ETV Bharat / entertainment

Zoya Akhtar breaks silence : प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ 'जी ले जरा'मधून बाहेर पडल्याबातमी बद्दल झोया अख्तरने सोडले मौन - जी ले जराचित्रपटाचे शुटिंग

प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ 'जी ले जरा'मधून बाहेर पडल्याच्या बातम्या गेल्या महिन्यात पसरल्या होत्या. या अफवांचे निर्माती झोया अख्तरने खंडन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया सुरू असून प्रियांका व कतरिना चित्रपटाच्या अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी सांगितले.

Zoya Akhtar breaks silence
प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ
author img

By

Published : Aug 2, 2023, 5:33 PM IST

मुंबई - निर्माती आणि दिग्दर्शक अख्तर भावंडांनी 'जी ले जरा' या चित्रपटाची घोषणा २०२१ मध्ये केली होती. झोया अख्तर आणि फरहान अख्तर यांनी रीमा कागती यांच्यासह या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर मेहनत घेतली. या चित्रपटाची घोषणा झाल्यामुळे चित्रपट उद्योग आणि इंटरनेट आणि सोशल मीडियावरील चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. 'जिंदगी ना मिले दोबारा' चित्रपटात जसे तीन मित्र अॅडवन्चेर्स रोड ट्रिपवर निघतात, त्याच पद्धतीने 'जी ले जरा' चित्रपटात मैत्रीणी घराबाहेर पडतात अशी कथा असणार आहे. एक रोड मुव्ही म्हणून सेट केलेल्या या बहुप्रतिक्षित चित्रपटात प्रियांका चोप्रा जोनास, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. यासाठी झोया, फरहान, रीमा कागतीसह सर्जनशील टीम चित्रपटावर काम करत आहे.

या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांना धक्का देणारी एक बातमी आल्याने खळबळ उडाली आहे. 'जी ले जरा' चित्रपटातून प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ बाहेर पडणार अशा चत्चा सुरू झाल्याने अनेकांना धक्का बसला. मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी यावर तातडीने प्रतिक्रिया देत या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आणि स्पष्ट केले की हे दोन्ही प्रतिभावान कलाकार ठामपणे बोर्डवर आहेत आणि चित्रपटासाठी वचनबद्ध आहेत.

झोया अख्तरने स्वतः बहुप्रतिक्षित चित्रपटाबद्दल अपडेट दिल्याने फिल्मी जगतातील रोमांच आणि अपेक्षा आणखी उंचावल्या. तिने 'जी ले जरा' चित्रपट रद्द झाल्याच्या अफवांचे खंडन केले आणि सांगितले की, कलाकारांच्या तारखा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. हा चित्रपट पूर्ण करण्याचा निर्धारही तिने यावेळी बोलून दाखवला.

'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'दिल धडकने दो', आणि 'गली बॉय' यांसारख्या चित्रपटांवरील तिच्या अप्रतिम कामगिरीसाठाी ओळखल्या जाणाऱ्या रामा कागती यांनीही जी ले जरासाठीचा उत्साह व्यक्त केला. या चित्रपटावरील काम सुरू असून या वर्षाच्या अखेरीस शुटिंगला सुरुवात होईल, असा विश्वासही बोलून दाखवला.

'जी ले जरा' हा चित्रपट महिलांच्यातील मजबूत नाते, साहस आणि महिला कुठल्याही गोष्टींसाठी वाद घालतात यासारख्या त्याच्या विषयीच्या चित्रणातून बाहेर उडण्याचा उत्सव असल्याचे मानले जाते. या चित्रपटाचे उद्दिष्ट महिलांचे एकत्र येणे, एकमेकांना आधार देणे आणि रूढीवादी कल्पनांना तोडणे हे दाखवणे असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार असल्याने अपेक्षाही खूप वाढल्या आहेत.

हेही वाचा -

१. Oh My God 2 Trailer Postponed : नितीन देसाईच्या निधनामुळे 'ओह माय गॉड २'चा ट्रेलर लांबणीवर

२. Nitin Desai Suicide Case : नितीन देसाईंच्या निधनाने कलाविश्वाला धक्का, आशुतोष गोवारीकरांसह दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

३. Nitin Chandrakant Desai : कलाविश्वातला प्रतिसृष्टीकर्ता 'आधुनिक विश्वामित्र' - नितीन चंद्रकांत देसाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.