ETV Bharat / entertainment

Zinda Banda Song : 'जवान'मधील 'जिंदा बंदा' गाणे प्रदर्शित, भव्य सेटवर शाहरुख खानचा जबरा डान्स

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातील पहिले गाणे 'जिंदा बंदा' हे गाणे ३१ जुलै रोजी प्रदर्शित झाले आहे. 'जवान' चित्रपटाच्या थरारक प्रीव्ह्यूनंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांना जबरदस्त भेट दिली आहे.

author img

By

Published : Jul 31, 2023, 12:58 PM IST

Zinda Banda Song
जिंदा बंदा गाणे

मुंबई : शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो एका वेगळ्याच अवतारात दिसणार आहे. नुकताच 'जवान' चित्रपटाचा प्रीव्ह्यू रिलीज झाला, जो चाहत्यांना खूप आवडला होता. यानंतर 'जवान'चे थीम साँग रिलीज झाले, तेही प्रेक्षकांना आवडले होते. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असताना निर्मात्यांनी आता चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचे लॉन्चिंग केले आहे.

शाहरुख खानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'जिंदा बंदा' या पहिल्या गाण्याच्याची झलक शेअर केली आहे. 'जिंदा बंदा' हे गाणे शाहरुख खानच्या करिअरमधील सर्वात महागडे गाणे आहे. या गाण्याला १५ कोटी पेक्षा जास्त रुपयांचा खर्च लागला आहे.

'जिंदा बंदा' १५ कोटींच्या बजेटमध्ये शूट करण्यात आले : 'जवान' चित्रपटाच्या थरारक प्रीव्ह्यूनंतर, अनिरुद्धने संगीतबद्ध केलेल्या डान्स नंबरसह उत्साह वाढविण्यासाठी आता शाहरुख गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू, मदुराई, मुंबई आणि इतर शहरांतील १००० हून अधिक महिला डान्स सादर करताना दिसत आहेत. 'जिंदा बंदा' हे गाणे १५ कोटींपेक्षा जास्त बजेटमध्ये बनवण्यात आले आहे. अनिरुद्धने यापुर्वी व्हाय धीस, कोलावेरी, अरेबिक कुथू आणि वाथी कमिंग सारखी सुपरहिट गाणी संगीतबद्ध केली आहेत. या मोठ्या हिट गाण्यांसाठी अनिरुद्धचे सर्वत्र कौतुक झाले आहे. दरम्यान शाहरुख खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून हे गाणे ३१ जुलै रोजी लॉन्च झाले आहे.

जवानाबद्दल जाणून घ्या : थेरी, बिगिल, मेर्सल आणि राजा रानी सारखे दमदार आणि सुपरहिट चित्रपट बनवणारे दक्षिणेतील तरुण दिग्दर्शक अरुण कुमार उर्फ अ‍ॅटली यांनी 'जवान' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच नयनतारा, दीपिका पदुकोण, संजय दत्त, विजय सेतुपती, प्रियामणी आणि दंगल गर्ल सान्या मल्होत्रा ​​या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Box Office Collection : 'ओपनहाइमर' 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ला मागे टाकत 'बार्बी' चित्रपटाने रोवला यशाचा झेंडा...
  2. Lata Mangeshkars classic melodies : लंडनच्या श्रद्धांजली मैफिलीसाठी पुन्हा एकदा वाजली लता मंगेशकरची गाणी...
  3. Sanjay Dutt : विजय स्टारर 'लिओ' चित्रपटामधील संजय दत्तचा फर्स्ट लूक रिलीज....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.