ETV Bharat / entertainment

2023 या वर्षातील सर्वात वादग्रस्त बॉलिवूड आणि साऊथ चित्रपट - बॉलिवूड आणि साऊथ

Year Ender 2023 : बॉलिवूड आणि साऊथमधून 2023 सालामध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. दरम्यान या वर्षी काही चित्रपटांबाबत खूप वाद सोशल मीडियावर पाहायला मिळाला. हे कुठले चित्रपट आहेत हे पाहूया.

Year Ender 2023
इयर एंडर 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 2:43 PM IST

मुंबई - Year Ender 2023 : भारतीय चित्रपटसृष्टीत दरवर्षी अनेक चित्रपट आणि वेब सीरीज या रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत असतात. काही चित्रपट किंवा वेब-सीरीज चांगली खळबळ उडवून देतात. दरवर्षीप्रमाणे 2023 मध्येही बॉलिवूड आणि साऊथमधून अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि साऊथचा सुपरस्टार विजय स्टारर चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. हे चित्रपट अनेकांना खूप आवडले. 2023 मध्ये सर्वात जास्त वाद अडकलेला चित्रपट 'आदिपुरुष' हा अनेकांनी नाकारला होता. आज आपण 2023 मधील काही विशेष चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'पठाण' : शाहरुखनं 'पठाण' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. 'पठाण'च्या 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिका पदुकोणच्या बिकिनीच्या रंगावरून बराच वाद झाला होता आणि चित्रपटाबाबत देशभरात निदर्शने झाली होती. शाहरुख आणि दीपिकाला जीवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची एकूण कमाई 1048 कोटी आहे.

'द केरल स्टोरी' : 'द कश्मीर फाईल्स' चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी 2023 मध्ये देखील आपल्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने देशभरात खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटातील धर्मांतराचा मुद्दा देशभरात तापला होता. द केरळ स्टोरी'नं बॉक्स ऑफिसवर 303.97 कोटीची कमाई केली होती. हा चित्रपट 5 मे 2023 प्रदर्शित झाला होता.

'आदिपुरुष' : 2023 मधील सर्वात वादग्रस्त चित्रपट 'आदिपुरुष' होता. प्रभास स्टारर हा चित्रपट 600 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या असून दिग्दर्शक ओम राऊत यांना देशातच नव्हे, तर परदेशातही शिवीगाळ करण्यात आली. हा चित्रपट रामायणावर आधारित होता. आदिपुरुषमधील राम, रावण आणि हनुमानाच्या लूक हे खूप चर्चेत होते. अनेकांनी या चित्रपटाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली होती. 'आदिपुरुष'चा संवाद खूप हास्यास्पद आणि असभ्य असल्यानं या चित्रपटावर बंदी यावी अशी मागणी करण्यात आली होती. 'आदिपुरुष'नं 353 कोटीचा व्यवसाय केला होता. हा चित्रपट 16 जून 2023 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता.

'ओएमजी 2' : अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम स्टारर चित्रपट 'ओएमजी 2'नं वादानंतरही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. देवावर आधारित या चित्रपटात लैंगिक शिक्षणावर चर्चा झाली, तेव्हा गदारोळ झाला. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या चित्रपटानं 220 कोटीची कमाई केली.

'लियो' : 2023 च्या सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांपैकी साऊथकडील सुपरस्टार थलपथी विजय स्टारर 'लिओ'ला देखील वादाला सामोरे जावे लागलं होतं. 'लिओ' चित्रपटाच्या ट्रेलरमधील विजयच्या संवादामुळे( महिलाविरोधी) सेन्सॉर बोर्डाने नोटीस बजावली होती आणि याप्रकरणी उत्तर मागितलं होतं. यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी आपले स्पष्टीकरण दिलं होतं आणि याबद्दल माफीही मागितली होती. हा चित्रपट 19 ऑक्टोबर 2023 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज झाला. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर 615 कोटीची कमाई करून दिली.

अ‍ॅनिमल : रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा 'गदर अजूनही बॉक्स ऑफिसवर सुरू आहे. या चित्रपटानं 20 दिवसांत 850 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. अ‍ॅनिमलच्या प्रदर्शनापूर्वी कोणताही विरोध झाला नव्हता, परंतु प्रदर्शित झाल्यानंतर हे उघड झाले की, हा चित्रपट महिलांना पुरुषांसाठी केवळ आनंदाची वस्तू मानतो. या चित्रपटात, रणबीर कपूर रश्मिका मंदान्ना, तृप्ती दिमरी , बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपट 1 डिसेंबर 2023ला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या चित्रपटानं आतापर्यत 850 कोटीची कमाई केली आहे. हा चित्रपट आता देखील रुपेरी पडद्यावर खूप कमाई करत आहे.

हेही वाचा :

  1. दुबईत 'डंकी'चं जोरदार प्रमोशन, ड्रोन शोमध्ये साकारली किंग खानची सिग्नेचर पोज
  2. 2023 मध्ये चंदेरी दुनियेत पदार्पण करणाऱ्या स्टार किड्स विषयी जाणून घ्या
  3. 2023 मध्ये ओटीटीवर पदार्पण करणारे साऊथ आणि बॉलिवूडचे कलाकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.