ETV Bharat / entertainment

Nitesh Tiwaris Ramayana : नितेश तिवारींच्या रामायणात रावणाची भूमिका करण्यास यशचा नकार - केजीएफ स्टार यशच्या टीमचा बहुमोल सल्ला

दिग्दर्शक नितेश तिवारीच्या रामायणमध्ये रावणाची भूमिका साऊथ सुपरस्टार यश साकारणार असल्याच्या अनेक बातम्या आल्या होत्या. मात्र ही भूमिका करण्यास केजीएफ स्टार यशने नकार दिला आहे.

Nitesh Tiwaris Ramayana
रावणाची भूमिका करण्यास यशचा नकार
author img

By

Published : Jun 12, 2023, 3:16 PM IST

मुंबई - दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी रामायणवर आधारित चित्रपटात रावणाच्या भूमिका करण्याससाऊथ सुपरस्टार यशने नकार दिला आहे. यासंबंधी त्याच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटात रावणाची भूमिका करण्यास केजीएफ स्टार यश उत्सुक होता. या चित्रपटात रामाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूर निश्चित झाल्यानतर रावणाची भूमिका साकारणे हे यशसाठी आव्हानात्मक आणि प्रतिष्ठेचे वाटत होते. ही भूमिका करण्यास तो खूप उत्साही झाला होता. मात्र त्याच्या टीमने त्याला ही भूमिका स्वीकारण्यास विरोध केला व त्याचे मन बदलवण्यातही यश मिळवले आहे.

केजीएफ स्टार यशच्या टीमचा बहुमोल सल्ला - सूत्राने खुलासा केला की, 'यशला ही भूमिका साकारण्यात खरोखरच रस होता. त्याला रामापेक्षा रावणाची भूमिका साकारणे अधिक आव्हानात्मक वाटत होते. रणबीर कपूरची रामाची भूमिका करण्यासाठी निवड झाल्यापासून यश या चित्रपटाच्या टीममध्ये येण्यास उत्सुक झाला होता. मात्र नंतर त्याच्या टीमने त्याला ही भूमिका न करण्याचा सल्ला दिला. रावणाची भूमिका सशक्त असली तरी यशला नकारात्मक भूमिकेत पाहणे त्याच्या चाहत्यांना आवडणार नाही', असा युक्तीवाद त्याच्या टीमने केला. यापूर्वी एका मुलाखतीदरम्यान, यशने असेही सांगितले की. 'त्याला त्याच्या चित्रपटाच्या निवडीबद्दल खूप सावधगिरी बाळगावी लागते. कारण त्याचे चाहते त्याच्याशी भावनिकरित्या संलग्न आहेत आणि जेव्हा तो त्यांच्या इच्छेविरुद्ध जातो तेव्हा त्यांच्या खूप तीव्र प्रतिक्रिया असतात.'

यशने रावणाची नाही तर रामाची भूमिका करावी - निर्मात्यांनी यशला रावणाच्या भूमिकेची ऑफर दिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यश हा रावणाच्या भूमिकेसाठी नाही तर रामाच्या भूमिकेसाठी योग्य असल्याचे कंगना रणौतने म्हटले होते. रणबीर कपूर भगवान रामची भूमिका करत असल्याच्या बातम्या पसरल्यानंतर तिने या चित्रपटाच्या कास्टिंगवर टीका केली. रणबीरवर ताशेरे ओढत कंगना म्हणाली होती की, कुणाही ड्रगी मुलाने भगवान रामाची भूमिका करु नये. रामायणावर आधारित आगामी चित्पटाच्या निर्मात्यांनी अद्याप रामायण कास्टिंगची अधिकृत घोषणा केलेली नाही.

हेही वाचा -

१. Krishna Bhatt Wedding : विक्रम भट्ट यांची मुलगी कृष्णा भट्टने वेदांत सारडाशी बांधली लग्नगाठ, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी

२. Abhishek Ambareesh Wedding : केजीएफ (Kgf) स्टार यशने दर्शन आणि रम्या कृष्णनसोबत केला हटके डान्स

३. Icc World Test Championship Final 2023 : विराट कोहली बाद झाल्यानंतर अनुष्का शर्मा सोशल मीडियावर ट्रोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.