ETV Bharat / entertainment

'आम्ही प्रथम भारतीय आहोत', अदनान सामीचा सीएम जगन मोहन रेड्डीना टोमणा - आम्ही प्रथम भारतीय आहोत

गायक अदनान सामी यांनी बुधवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर टीका केली. आरआरआर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तेलुगुचा अभिमान दर्शवणारी पोस्ट केली होती. यावर सामी यांनी आम्ही पहिल्यांदा भारतीय आहोत, म्हणत जगन मोहन रेड्डी यांना सुनावले.

अदनान सामीचा सीएम जगन मोहन रेड्डीना टोमणा

author img

By

Published : Jan 12, 2023, 9:43 AM IST

Updated : Jan 12, 2023, 11:01 AM IST

मुंबई - संगीतकार आणि गायक अदनान सामी यांनी बुधवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर टीका केली. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री असलेल्या जगन मोहन यांनी आरआरआर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्यानंतर ट्विटरवरुन अभिनंदन केले होते. यामध्ये त्यांनी आरआरआर चित्रपट तेलुगु असल्याचा विशेष उल्लेख केला होता.

जगन रेड्डी यांनी ट्विटरवर लिहिले, 'तेलुगु ध्वज उंच फडकत आहे! सर्व आंध्र प्रदेशच्या वतीने, मी एमएम किरवाणी, तारक, रामचरण आणि आरआरआर चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. !'

तथापि, आंध्रच्या मुख्यमंत्र्यांचा अभिनंदनाचा हा संदेश 'लिफ्ट करा दे' फेम गायक अदनान सामी यांना पटला नाही. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करणारे वक्तव्य सामी यांनी केले.

ट्विटला उत्तर देताना अदनान सामीने लिहिले, "तेलुगु ध्वज? तुम्हाला भारतीय ध्वज म्हणायचे आहे बरोबर? आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि म्हणून कृपया स्वतःला इतर देशांपासून वेगळे करणे थांबवा... विशेषत: आंतरराष्ट्रीय स्तरावर, आम्ही एक देश आहोत! हा 'अलिप्ततावादी' दृष्टीकोन 1947 मध्ये अतिशय घातकपणे आपण पाहिला आहे!!! धन्यवाद...जय हिंद!"

  • Telugu flag? You mean INDIAN flag right? We are Indians first & so kindly stop separating yourself from the rest of the country…Especially internationally, we are one country!
    This ‘separatist’ attitude is highly unhealthy as we saw in 1947!!!
    Thank you…Jai HIND!🇮🇳 https://t.co/rE7Ilmcdzb

    — Adnan Sami (@AdnanSamiLive) January 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ट्विटवरच्या त्याच्या या प्रतिक्रियेने सोशल मीडिया दोन भागात विभागला गेला, अनेकांनी त्याच्या उत्तराबद्दल गायकाचे कौतुक केले, तर अनेकांनी त्याच्यावर टीका केली.

'त्याला अलिप्ततावादी वृत्ती म्हणून काय वाटले? एकाच राज्यातील लोकांचा अभिमान बाळगण्यात गैर काय आहे. आणि तुम्हाला इथली यंत्रणा माहीत नसल्यामुळे लक्षात ठेवा की ते आंध्र प्रदेश राज्याचा प्रमुख आहेत,' एका चाहत्याने कमेंट केली.

अदनान सामीने आपले पाकिस्तानी नागरिकत्व सोडले आणि 2016 मध्ये तो भारताचा नागरिक बनला आणि त्याला 2020 मध्ये भारताचा चौथा-सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने बुधवारी 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मूळ स्कोअरचा पुरस्कार जिंकला.ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांचा समावेश असलेला नाटू नाटू हा डान्स नंबर टेलर स्विफ्टच्या 'कॅरोलिना' फ्रॉम व्हेअर द क्रॉडॅड्स सिंग, गिलेर्मो डेल टोरोज पिनोचिओचा 'सियाओ पापा', टॉप गन: मॅव्हर मधील लेडी गागाचा 'होल्ड माय हँड' , आणि ब्लॅक पँथर मधील रिहानाने सादर केलेल्या 'लिफ्ट मी यू': वाकांडा फॉरएव्हर या गाण्यांशी स्परधा करत होता.

हेही वाचा - शाहिद कपूरच्या फर्जी चित्रपटाचा फेक ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल

Last Updated : Jan 12, 2023, 11:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.