ETV Bharat / entertainment

IIFA 2023 : सलमान खानच्या अंगरक्षकाने धक्काबुक्की केल्यानंतर विकी कौशलची पहिली प्रतिक्रिया - bodyguards pushing him

आयफा पुरसकार सोहळ्यासाठी अबुधाबीमध्ये पोहोचलेल्या विकी कौशलला सलमान खानच्या सुरक्षा रक्षकांनी धक्का दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. याबाबक विकीने आपले मौन सोडले आहे. त्यांने यावर काय प्रतिक्रिया दिली ते बातमीत वाचा.

Vicky Kaushal and Salman Khan
विकी कौशल आणि सलमान खान
author img

By

Published : May 27, 2023, 11:29 AM IST

अबू धाबी: अबू धाबीमध्ये आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार आयफा 2023 हा सुरू झाला आहे. हा कार्यक्रम सुरू होण्यापुर्वी अभिनेता विकी कौशल हा त्याच्या चाहत्यासोबत सेल्फी काढत असताना अभिनेता सलमान खानची एन्ट्री झाली त्यानंतर विकी हा त्याला हँडशेक करण्यासाठी समोर आला मात्र तिथे त्याला सलमानच्या अंगरक्षकाने रोखले आणि त्याला बाजूला केले. त्यानंतर याप्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर वाद निर्माण झाला. व्हायरल व्हिडिओ हा गुरुवारी असणाऱ्या आयफा पत्रकार परिषदेचा आहे, ज्यात विकी, अभिषेक बच्चन, रकुल प्रीत सिंग, नोरा फतेही, राजकुमार राव, आणि सलमान उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ते लोक उशिरा पोहोचले होते.

आयफा रॉक्स : आयफा रॉक्स ग्रीन कार्पेटवर विक्कीला या घटनेबद्दल विचारण्यात आले, तर व्हायरल क्लिपवर प्रतिक्रिया देताना, विक्कीने सांगितले, 'कई बार बहुत बातें खराब हो जाती हैं' (काही गोष्टींबद्दल अनावश्यक बडबड होऊन जाते). गोष्टी व्हिडीओमध्ये जे दिसते तसे प्रत्यक्षात नसते. त्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही.'खरं तर, विकी आणि सलमान हे ग्रीन कार्पेटवर एकमेकांना भेटले तेव्हा त्यांनी घट्ट मिठी मारली. या दोघांमध्ये ठीक नसल्याचा दावा करणाऱ्या बातम्यांचा इथेच शेवट झाला. विकी यावेळी अभिषेक बच्चनसोबत आयफा होस्ट करत आहे, तर सलमान हा आयफा मंचावर झळणार आहे.

यावेळी होणार चित्रपट प्रदर्शित : दरम्यान, विकी हा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित जरा 'हटके जरा बचके' या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज आहे. २ जून रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो सारा अली खानसोबत दिसणार आहे. तर दुसरीकडे, सलमान हा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसला होता. आता सलमान 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे . हा चित्रपट यशराज फिल्म्सचा असून या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि इमरान हाश्मी हे देखील प्रमुख भूमिकेत असणार आहेत. सलमानचा टायगर 3 हा चित्रपट या दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : Sunny Leone cast for Kennedy : केनेडीसाठी सनी लिओनला का निवडले, याचा अनुराग कश्यपने केला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.