ETV Bharat / entertainment

Suhana Khan video : सुहाना खानचे छोट्या अबरामसोबतचे प्रेमळ क्षण, वानखेडेवरील व्हिडिओ व्हायरल - वानखेडेवरील व्हिडिओ व्हायरल

शाहरुख खान आणि गौरी खानची मुलं नेहमीच मीडियाच्या समोर चकाकीत असतात. त्यांचे व्हिडिओ अपलोड झाल्याच्या काही सेकंदात व्हायरल होतात. एका फॅन पेजने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुहाना तिचा भाऊ अबरामसोबत गोड क्षण घालवताना दिसत आहे.

सुहाना खानचे छोट्या अबरामसोबतचे प्रेमळ क्षण

author img

By

Published : Apr 17, 2023, 6:28 PM IST

मुंबई - सुहाना खान, आर्यन आणि अबराम खान ही शाहरुख खान आणि गौरी खानची तीन्ही मुले त्यांच्यासाठी अभिमानास्पद आहेत. सुहाना, आर्यन आणि अबराम हे सर्वात प्रिय आणि सुप्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहेत आणि जेव्हाही त्यांचे फोटो सोशल मीडियावर दिसतात तेव्हा त्यांचे चाहते वेडे होतात. सुहाना खान आणि अबराम खान ही शाहरुख खानची लहान मुले, नुकतेच रविवारी वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील IPL 2023 सामन्याला हजर होती.

वानखेडे स्टेडियमवर खान भावंडं - शाहरुख खान कोलकाता नाईट रायडर्सचा सह-मालक आहे. सध्या, सुहाना आणि अबरामचा एक सुंदर क्षण शेअर करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एमआय विरुद्ध केकेआर गेममधील सुहाना खान आणि अबरामच्या फोटो आणि व्हिडिओंनी सोशल मीडिया तुडुंब भरला आहे.

सुहानाचा क्रिकेट मैदानातील लूक - ट्विटरवर एका फॅन पेजने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुहाना आणि तिचा धाकटा भाऊ अबराम एक गोड क्षण शेअर करताना दिसत आहेत. सुहाना तिच्या भावाच्या मागे रेल पकडत उभी असलेली दिसते. भाऊ आणि बहीण संभाषणात व्यस्त असताना ती पुढे झुकते आणि त्याला काहीतरी म्हणते. सुहानाला तिचा लुक पूर्ण करण्यासाठी लाल आणि काळा टी-शर्ट आणि सोनेरी हूप्सचा समावेश असलेला कॅज्युअल पोशाख घातला होता.

ब्युटी ब्रॅंडचा चेहरा बनली सुहाना - वर्क फ्रंटवर, सुहाना खान अलीकडेच एका ब्युटी ब्रँडचा चेहरा बनली आहे. वडील शाहरुख खान यांनी आपल्या मुलीचे तिच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ब्रँड एंडोर्समेंटबद्दल अभिनंदन केले. अलिकडेच स्टार किंडसुहाना खानने मुंबईतील एका गाला इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिची ब्युटी ब्रँड मेबेलाइनची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. शाहरुखचे चाहते व सपहानाच्या फॉलोअर्सनी तिच्यावर अभिनंदना संदेशांचा अक्षरशः वर्षाव केला आहे. या पार्श्वभूमीवर ती पहिल्यांदाच भावांसोबत वानखेडे स्टेडियमवर आली होती.

हेही वाचा - Deepika Padukone : दीपिकाचा सद्य मानसिक स्थितीचा एक मजेदार मीमद्वारे इशारा; व्हायरल रीलमुळे झाले प्रभावित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.