ETV Bharat / entertainment

'डंकी'ची फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकिट बुकिंगसाठी किंग खानचे चाहते ढोल ट्रॅक्टरसह पोहचले चित्रपटगृहात - फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकिट

SRK's Chandigarh fans : अभिनेता शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाची क्रेझ प्रचंड पाहायला मिळत आहे. आता या चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकिटं बुक करण्यासाठी शाहरुखचे चाहते ड्रम आणि ट्रॅक्टरसह चित्रपटगृहामध्ये पोहोचत आहेत.

SRKs Chandigarh fans
शाहरुख खानचे चंदीगडचे चाहते
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2023, 5:53 PM IST

मुंबई - SRK's Chandigarh fans : अभिनेता शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाचं प्रमोशन किंग खान खूप जोरदार करताना सध्या दिसत आहे. हा चित्रपट 21 डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज होईल. आता अनेकजण चित्रपटाची वाट आतुरतेनं पाहत आहेत. 'डंकी' चित्रपटाचं आगाऊ बुकिंग जोरात सुरू आहे. पंजाबी पार्श्वभूमीवर आधारित 'डंकी' या चित्रपटाला चंदीगडमध्येही भरभरून प्रेम मिळत आहे. 'डंकी' चित्रपटासाठी जालंधरमध्ये फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकिटं बुक करण्यासाठी चंदीगडचे किंग खानचे चाहते ड्रमसह ट्रॅक्टरमधून दाखल होताना सध्या दिसत आहेत.

शाहरुख खान फॅन क्लबचे व्हिडिओ : शाहरुख खानच्या फॅन क्लबनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये किंग खानचे चाहते 'डंकी' चित्रपटासाठी खूप उत्सुक दिसत आहेत. अनेक चाहते पंजाबी वेशभूषेत ढोलच्या तालावर नाचताना दिसत आहेत. काही चाहते शाहरुख खानच्या आगामी चित्रपटासाठी देवाजवळ आणि गुरुद्वारामध्ये प्रार्थना करताना दिसत आहेत. याशिवाय सध्या काही ठिकाणी फर्स्ट डे फर्स्ट शोच्या तिकिटांसाठी तिकिट खिडकीवर गोंधळ घालताना चाहते दिसत आहेत. तसेच जालंधरमधील ढिल्लॉन प्लाझाबाहेर चाहते 'डंकी'च्या रिलीजपूर्वी सेलिब्रेशन करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

'डंकी' चित्रपटाबद्दल : काही चाहते तर ट्रॅक्टरमधून तिकिट खरेदी करण्यासाठी चित्रपटगृहांच्या खिडकीवर पोहोचत आहेत. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी'मध्ये शाहरुख खान हरदयाल सिंग उर्फ ​​हार्डीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटामध्ये किंग खान व्यतिरिक्त विकी कौशल, तापसी पन्नू आणि बोमन इराणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कहाणी चार मित्रांवर आधारित आहेत, जे व्हिसाशिवाय लंडनमध्ये दाखल होतात. त्यांना या ठिकाणी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जेव्हा ते लंडनला पोहोचतात तेव्हा, तेथील पोलीस त्यांना पकडून न्यायालयात हजर करतात. या चित्रपटाची कहाणी जरा हटके आहे. किंग खानला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर जोरदार कमाई करणार असं सध्या दिसून येत आहे.

  • Inse milke humara dil lutt putt ho gaya! Thank you Global Village and the lovely people of Dubai for gracing us with so much love & joy. ❤️#DunkiTakesOverDubai

    Advance bookings are now open so book your tickets right away!#Dunki releasing worldwide in cinemas on Thursday,… pic.twitter.com/imU8XpHFNY

    — Red Chillies Entertainment (@RedChilliesEnt) December 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा :

  1. 'डंकी'च्या हार्ड हिटिंग डायलॉगवर चाहते झाले फिदा
  2. 'फायटर'च्या शूटिंग सेटवरील हृतिक रोशनचा व्हिडिओ व्हायरल ; पाहा व्हिडिओ
  3. मेरी ख्रिसमसचा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित,जाणून घ्या तारीख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.