ETV Bharat / entertainment

Rajasthani Desi Food: सारा अली खान आणि विकी कौशल यांनी घेतला देसी जेवणाचा आस्वाद - desi food

सारा अली खान आणि विकी कौशल त्यांच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राजस्थानमध्ये आहेत. या कलाकारांनी राजस्थानमधील 170 सदस्यांच्या कुटुंबाला भेट दिली. शिवाय तेथील चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेतला.

Sara Ali Khan and Vicky Kaushal
सारा अली खान आणि विकी कौशल
author img

By

Published : May 22, 2023, 12:06 PM IST

मुंबई - अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये चर्चेत आलेली बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या आगामी चित्रपट 'जरा हटके जरा बचके'चे प्रमोशन करतांना दिसत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती अभिनेता विकी कौशलसोबत राजस्थानला गेली आहे. जयपूरमध्ये 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटातील नवीन गाणे 'तेरे वास्ते'चे ते लॉन्चिंग करणार आहेत. पण गाण्याचे अनावरण करण्यापूर्वी, सारा आणि विकीने राजस्थानमधील 170 सदस्यांच्या कुटुंबाला भेट दिली आणि चुलीवर बनवलेल्या रोट्यांचा आनंद घेतला आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सारा आणि विक्की गेले राजस्थानला : सोमवारी विकीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे, ज्यामध्ये तो आणि सारा या मोठ्या राजस्थानी कुटुंबाशी संवाद साधताना दिसत आहेत. सारा आणि विकीच्या चित्रपटाचे कथानक एकत्र कुटुंबात राहणाऱ्या नवविवाहित जोडप्याभोवती फिरणारे असल्याने निर्मात्यांनी त्यांना राजस्थानमधील 170 सदस्यांच्या या संयुक्त कुटुंबाला भेट देण्याास लावले.

राजस्थानी जेवणाता घेतला आस्वाद : एका व्हिडिओमध्ये, विकी आणि सारा यांनी राजस्थानी गाणी गात असलेल्या कुटुंबातील महिला सदस्यांनी दिलेल्या रोट्या आणि करीचा आस्वाद घेतांना दिसत आहेत. तसेच विकी आणि साराला देसी जेवण आवडले आहे. या व्हिडिओमध्ये दोघे महिलेचे कौतुक करताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना विकीने लिहिले, 'गॉसिप सत्र- सहपरिवार! 170 सदस्यांसह एक संयुक्त कुटुंब... जितना बड़ा परिवार उतना ही भी बड़ा दिल. दिल से राम है आप सबको! इमोजीसह पोस्ट केली आहे.' तसेच यावेळी विक्कीने त्याच्या चाहत्यांना 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाची रिलीज डेटची आठवण करून दिली आहे. हा चित्रपट सिनेमागृहात 2 जूनला रिलीज होणार आहे.

विक्की आणि सारा पहिल्यांदा रूपेरी पडद्यावर एकत्र : हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच या चित्रपटाची कथा हा मध्य प्रदेशातील इंदूर येथे सेट करण्यात आली आहे. या चित्रपटात विक्की हा कपिलच्या भूमिकेत दिसणार तर सारा ही सौम्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दोघे नवविवाहीत दाखविणार आहे. तसेच या चित्रपटाची कहाणी ही घटस्फोट घेणार्‍या कपिल आणि सौम्याभोवती फिरणारी असणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिस काय जादू करणार हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेल.

हेही वाचा: Actress Accident Death : शुटिंगवरून परतताना प्रसिद्ध अभिनेत्रीला ट्रकने चिरडले; जागीच सोडले प्राण

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.