ETV Bharat / entertainment

लग्नाआधी रणदीप हुडा आणि गर्लफ्रेंडसह घेतलं इम्फाळ येथील मंदिरात दर्शन - गर्लफ्रेंड लिन लैश्राम

Randeep Hooda and lin laishram : रणदीप हुड्डा आणि त्याची गर्लफ्रेंड लिन लैश्रामसोबत लग्नापूर्वी इम्फाळ येथील मंदिरात पोहचला. यावेळी त्यानं देवाचं दर्शन केलं.

Randeep Hooda and lin laishram
रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 4:31 PM IST

मुंबई - Randeep Hooda and lin laishram : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा त्याची गर्लफ्रेंड लिन लैश्रामसोबत 29 नोव्हेंबर रोजी लग्न करणार आहे. अलीकडेच, त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्याच्या लग्नाची तारीख जाहीर केली. आता रणदीप हुड्डा लग्नाच्या एक दिवस अगोदर त्याच्या होणाऱ्या पत्नीसह इम्फाळ (मणिपूर) येथे पोहोचला आहे. लग्नाच्या एक दिवस आधी रणदीप आणि लिननं मंदिरात पूजा केली आहे. इम्फाळच्या हेगांगमध्ये असलेल्या मंदिरातील रणदीप आणि लिनचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रणदीप आणि लियानचा विवाहसोहळा आज 28 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

  • STORY | "I pray for a happy future, peace for Manipur and everywhere in the world, a happy married life and many more things," says Bollywood actor Randeep Hooda after arriving in Imphal to marry his girlfriend Manipuri model and actress Lin Laishram.

    READ:… pic.twitter.com/X6GnXBCfHO

    — Press Trust of India (@PTI_News) November 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रणदीप हुड्डाच्या लग्नात येणार कलाकार ? : व्हायरल झालेल्या व्हिडिओत रणदीपला त्याच्या लग्नात येणाऱ्या स्टार पाहुण्यांबद्दल विचारण्यात आले. यावेळी रणदीपला विचारण्यात आले की, तुमच्या लग्नाला बॉलिवूडमधील कोणते स्टार्स उपस्थित राहणार आहे. यावर रणदीप म्हणतो, 'फक्त मी' त्यानंतर आणखी त्याला विचारण्यात येते की तू लग्नासाठी नर्वस आहे का? त्यानंतर तो म्हणतो की, 'सर्वजणचं असतात' त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करून त्याला शुभेच्छा देत आहेत. रणदीप आणि लिनचं लग्न इम्फाळमध्ये होईल. आज या जोडप्याच्या मेहंदी आणि हळदी समारंभाचा कार्यक्रम असून लग्नासाठी पाहुण्यांचेही आगमन सुरू झाले आहेत.

मुंबईत होईल रिसेप्शन : 29 नोव्हेंबर 2023 रोजी, रणदीप आणि लिन हे कुटुंबिय आणि नातेवाईकांच्या उपस्थित लग्न करणार आहेत. अलीकडेच, या जोडप्यानं त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करून सर्वांना सुखद धक्का दिला होता. या पोस्टमध्ये रणदीपनं लिहिलं होत की, 'आमचे लग्न 29 नोव्हेंबर 2023 रोजी इंफाळमध्ये होणार आहे हे जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आयुष्याच्या नवीन इनिंगसाठी आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे.' याशिवाय लग्नानंतर, हे जोडपे मुंबईत एक भव्य रिसेप्शन पार्टी देणार आहेत, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आलिया भट्टनं महिलांना केलं जागृत
  2. रश्मिका मंदान्नाच्या 'द गर्लफ्रेंड' चित्रपटाच्या शुटिंगला हैदराबादमध्ये सुरुवात
  3. 'कल हो ना हो'च्या प्रत्येक फ्रेममध्ये जाणवते वडिलांची उपस्थिती, करण जोहरची भावनिक पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.