ETV Bharat / entertainment

Parineeti Chopras engagement : राघव चढ्ढासोबतच्या एंगेजमेंटसाठी परिणीतीच्या घरावर रोषणाई - राघव चढ्ढासोबतच्या एंगेमेंटसाठी परिणीती

अभिनेत्री परिणीती चोप्रा दिल्लीत आप नेते राघव चड्ढा यांची एंगेजमेंट १३ तारखेला पार पडणार आहे. यासाठी परिणीतीची मुंबईतील घर सज्ज झाले असून घरावर रोषणाई केल्याचे लेटेस्ट फोटो झळकले आहेत.

Parineeti Chopras engagement
राघव परिणीतीच्या एगेजमेंटसाठी घर सज्ज
author img

By

Published : May 12, 2023, 12:12 PM IST

Updated : May 12, 2023, 1:14 PM IST

मुंबई - अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चड्ढा बऱ्याच दिवसांपासून डेट करीत असल्याच्या चर्चा आपण ऐकत आलोय. दोघे अनेकवेळा एकत्र दिसलेत, मुंबईत आणि दिल्लीत त्यांच्या एकत्र दिसण्याचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले शिवाय दोघे आयपीएल सामना पाहण्यासाठी आले असता प्रेक्षकांनी परिणीतीला भाभी म्हणूनही बोलवलंय, इतकं होऊनही ते आपण नात्यात आहोत असे म्हणाले नव्हते. पण त्यांची कृती चाहते आणि फॉलोअर्स विसरू शकलेले नाहीत. पण सध्या परिणीतीचे मुंबईतील वांद्रे येथील घर सजवण्यात आलंय.

एंगेजमेंटसाठी परिणीतीच्या घरावर रोषणाई

राघव परिणीतीच्या एगेजमेंटसाठी घर सज्ज - परिणीतीच्या घरातील लेटेस्ट फोटोंमध्ये, संपूर्ण बाल्कनी परिसरात सजावटीची रोषणाई दिसू लागली असून घरात सुरू असलेली लगीनघाई स्पष्ट दिसत आहे. १३ मे रोजी परिणीतीचा साखरपुडा होणार आहे. एका सूत्रानुसार, हे दोघे 13 मे रोजी दिल्लीत अंगठ्याची देवाणघेवाण करतील. सुमारे 150 जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एंगेजमेंटला निवडक लोक निमंत्रीत - या कार्यक्रमाला राजकीय आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता आहे. परिणीती किंवा राघव या दोघांनीही अधिकृतपणे त्यांच्या नात्याची घोषणा केलेली नसली तरी एका राजकीय नेत्याने याबद्दलचे स्पष्ट सूतोवाच आणि अभिनंदनही केले होते. आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी परिणीती आणि राघवच्या छायाचित्रांचा कोलाज शेअर केला होता. अरोरा यांनी ट्विट करत म्हटले होते की, 'राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या मिलनाला भरपूर प्रेम, आनंद आणि सहवास लाभो. माझ्या शुभेच्छा', असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

राघव आणि परिणीतीची मैत्री - मार्चमध्ये मुंबईत लंच डेटवर एकत्र दिसल्यानंतर परिणीती आणि राघवच्या डेटिंगच्या अफवा सुरू वाढल्या. परिणीती आणि राघव लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिकले आहेत आणि बऱ्याच काळापासून मैत्रित आहेत. परिणीती आणि राघवही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.

दरम्यान, वर्क फ्रंटवर, परिणीती चमकीला या चित्रपटात दिलजीत दोसांझसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट अमरजोत कौर आणि अमर सिंग चमकिला या दोन लोकप्रिय पंजाबी गायिकांभोवती फिरतो. राघव चढ्ढा हे पंजाबमधून राज्यसभेचे सदस्य आहेत.

हेही वाचा - Kangana Ranaut talks : कंगना रणौतने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी केले होते हेही काम

Last Updated : May 12, 2023, 1:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.