ETV Bharat / entertainment

Khurana hold their mothers hands : वडिलांच्या मृत्यूनंतर आयुष्मान आणि अपारशक्ती आईसोबत मुंबईत दाखल - अपारशक्ती आईसोबत मुंबईत दाखल

अभिनेता आयुष्मान खुराना आणि अपारशक्ती खुराना आईसोबत मुंबईला परतले आहेत. वडील पी खुराना यांचे गेल्या महिन्यात निधन झाले होते. यापार्श्वभूमीवर खुराना बंधूंनी आईला आपल्यासोबत आणले आहे.

Khurana hold their mothers hands
आयुष्मान आणि अपारशक्ती आईसोबत मुंबईत दाखल
author img

By

Published : Jun 6, 2023, 12:23 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि त्याचा भाऊ अपारशक्ती खुराना दोघेही त्यांची आई पूनम खुरानासोबत चंदीगडहून मुंबईला पोहोचले आहेत. पापाराझींनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत हे खुराना बंधू मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहेत. गाडीकडे जाताना दोघांनी आईचा हात धरला आहे.

आईसोबत विमानतळावर दिसले खुराना बंधू - व्हिडिओमध्ये पूनम खुराना आपल्या दोन मुलांचे हात धरून त्यांच्या कारकडे चालत असल्याचे दिसत आहे. यावेळी पुनम यांनी पांढरा लेगिंग आणि पांढरा स्नीकर्स असलेला गडद निळा कुर्ता परिधान केला होता. आयुष्मानने हिरवा टी-शर्ट, काळी पँट आणि स्नीकर्स परिधान केले होते आणि चष्माही लावला होता. दुसरीकडे, अपारशक्तीने निळ्या रंगाच्या टी-शर्टवर पीच शर्ट घातला होता ज्यात मॅचिंग ट्राउझर्स आणि पांढरे स्नीकर्स होते. व्हिडिओ शेअर होताच सोशल मीडिया यूजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रियांसाठी गर्दी केली.

आईला धीर देताना दिसले खुराना ब्रदर्स - पापाराझींनी शेअर केलेला व्हिडिओ अतिशय भावूक करणारा आहे. पतीच्या निधनानंतर पुनम खुराना या खचल्या होत्या. या दुःचा विसर सहज पणे कठीण. म्हणूनच आयुष्मान आणि अपारशक्तीने आईला मुंबईला सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला. विमानतळावरुन बाहेर चालत येत असताना दोघेही भाऊ आईला आम्ही तुझ्यापाठीशी सदैव आहोत हे ठाम सांगताना दिसत आहे. आपल्या मुलांनी दिलेला हा धीर आईसाठी खूप काही सांत्वन देणारा आहे.

आयुष्मान आणि अपारशक्तीच्या वडिलांचे निधन - आयुष्मान आणि अपारशक्तीचे वडील पी खुराना यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. ते एक नामवंत ज्येतिषी होते. त्यांनी वर्तवलेली भविष्ये भारतातील अनेक वाहिन्या आणि वर्तमानपत्रातून प्रसिद्द होत असत. ईटीव्ही भारतसाठीही ते राशीभविष्य नियमीतपणे लिहित असत. त्यांच्या निधनानंतर खुराना कुटुंबीयांवर दुःखाचे संकट कोसळले होते. या सर्वातून आईची काळजी घेण्यासाठी खुराना बंधूंनी आईला मुंबईला सोबत आणण्याचा निर्णय घेतला आहे. काही काळ मुलांसोबत राहिल्याने या दुःखद वातावरणातून बाहेर पडण्यासाठी उपयोग होऊ शकेल.

हेही वाचा -

  1. Nysa Devgan : न्यासा देवगण पुन्हा दिसली कथित बॉयफ्रेंडसोबत, पहा फोटो
  2. Monika Bhadoriya News : तारक मेहता का उल्टा चष्मामधील बावरीनेही निर्मात्यावर केले गंभीर आरोप, म्हणाली...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.