ETV Bharat / entertainment

दुबईच्या रस्त्यावर रहमानच्या परदेशी फॅनने गायले 'मां तुझे सलाम', व्हिडिओ व्हायरल - Maa Tujhe Salaam on Dubai street

Maa Tujhe Salaam on Dubai street : एआर रहमानची दुबईत फ्रेंच इंडोनेशियन कलाकार सेलिनेडी माताहारीशी रस्त्यात भेट झाली. रहमानची चाहती असलेल्या सेलिनेडीने त्याच्यासमोर गायन करण्याची परवानगी मागितली. त्यानंतर तिनं 'मां तुझे सलाम' हे गीत गायले ज्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग स्वतः रहमानने केले आहे.

Maa Tujhe Salaam on Dubai street
रहमानच्या परदेशी फॅनने गायले 'मां तुझे सलाम'
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 1:06 PM IST

मुंबई - Maa Tujhe Salaam on Dubai street : संगीतकार ए.आर. रहमान दुबईमध्ये एका डायहार्ड चाहतीला भेटला तेव्हा त्यानं एक हृदयस्पर्शी अनुभव घेतला. रहमान जात असलेल्या कार जवळ एक मुलगी आली आणि तिने त्याच्यासाठी गायन करण्याची इच्छा बोलून दाखवली. या अनाहुत पाहुणीने दिलेल्या ऑफरमुळे रहमान चकित झाला आणि तिला गायन करण्यास सांगितले. खुद्द रहमानने तिचा सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये, फ्रेंच इंडोनेशियन चाहती असलेली सेलिनेडी माताहारीने रहमानचे कौतुक केले आणि तिने त्याचा फॅन असल्याचं सांगितलं. त्यानंतर तिने गाणे सादर करण्याची परवानगी मागितली. रहमानने दयाळूपणे सहमती दर्शवली. सेलिनेडीने एआर रहमानचे सुप्रसिद्ध देशभक्तीपर गाणे 'मां तुझे सलाम'चे गायन करुन तिच्या संगीत प्रतिभेचे प्रदर्शन केले. ती गात असताना सुंदर गिटारही वाजवत होती.

कारमध्ये बसलेल्या एआर रहानला तिचे गाणे, गिटार वाजवणे पसंत आल्याचं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. रहमानने त्याच्या सेल फोनवर सेलिनेडीचा उत्स्फूर्त परफॉर्मन्स रेकॉर्ड केला. नंतर, त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर हा हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला. यामुळे चाहत्यांना कुशल संगीतकार असलेल्या रहमान आणि त्याचे समर्पित अनुयायी यांच्यातील संगीताची सुंदर देवाणघेवाण पाहण्याची संधी मिळाली.

या संधीबद्दल कृतज्ञ असलेल्या सेलिनेडीने 'मां तुझे सलाम'चे तिचे सादरीकरण तिच्या स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. तिनं रहमान सरांना भेटण्याचा आनंद व्यक्त करताना स्वतऋला भाग्यवान समजलं आहे. नेटिझन्सही तिच्या या आनंदात सामील झाले आहेत.

एका नेटिझन्सनने आपला आनंद व्यक्त करताना लिहिले, "एका महत्त्वाकांक्षी कलाकाराचे ए.आर. रहमानसमोर वंदे मातरमचे गायन करण्याचे स्वप्न पूर्ण झाले." आणखी एकाने लिहिले की, "रहमानने एका अनोळख्या व्यक्तीला दाद देताना त्याच्या गाण्याचे स्वतः रेकॉर्डिंग करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे."

चित्रपटाच्या आघाडीवर, रहमान सध्या ऐश्वर्या रजनीकांतच्या आगामी चित्रपट 'लाल सलाम' वर काम करत आहे. शिवकार्तिकेयन आणि रकुल प्रीत सिंग यांचा समावेश असलेला तमिळ चित्रपट 'आयलान' मधील 'सुरो सुरो' हे गाणे अलकिडे रिलीज झाले आहे. त्याच्या आगामी प्रकल्पांमध्ये राम चरणचा शीर्षक नसलेला चित्रपट (RC16) आणि दिलजीत दोसांझ आणि परिणिती चोप्रा-स्टारर चमकिला या चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा -

  1. महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी केली जबरदस्त कामगिरी
  2. प्रभास, प्रशांत नीलसह टीमने साजरी केली 'सालार सक्सेस पार्टी'
  3. राम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.