मुंबई - बॉलिवूड बहिष्काराचा मुद्दा गेल्या काही महिन्यापासून वादाचा विषय बनला. याचा फटका ब्रम्हास्त्र, लाल सिंग चढ्डा या चित्रपटासाह अक्षय कुमारच्या रक्षा बंधनलाही बसला. आता शाहरुख खानच्या पठाण चित्रपटालाही उजव्या विचारसरणीचे लोक विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले पहिल्यांदाच भाष्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांना चित्रपटांवर भाष्य करणे थांबवण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप याने पंतप्रधान यांना खूप उशीर झाल्याचे म्हटले होते. अनुरागच्या या बोलण्याला आता चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी उत्तर दिले आहे.
अनुराग कश्यप आणि विवेक अग्निहोत्री यांच्यात यापूर्वीही अनेकदा शाब्दिक चकमक झाली आहे. पहिल्यांदा अनुराग कश्यपने काय म्हटले होते ते पाहूयात. पंतप्रधानांना उद्देशन अनुरागने म्हटले होते, 'जर त्यांनी हे चार वर्षापूर्वी सांगितलं असतं, तर ती गोष्ट वेगळी होती. गोष्टी आता हाताबाहेर गेल्या आहेत. कोणी कोणाचे ऐकेल असे मला वाटत नाही.' पुढे अनुराग म्हणतो की, 'मॉब इज आऊट ऑफ कंट्रोल नाऊ.' अलया एफ अभिनीत डीजे मोहब्बत या त्याच्या आगामी चित्रपट अलमोस्ट प्यारच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी बोलताना अनुरागने वरील उद्गार काढले होते. अनुराग कश्यपची ही बातमी शेअर करताना, काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ट्विट केले, 'प्रेक्षक आता ‘मॉब’ आहेत? व्वा! व्वा! व्वा!'
-
Audience is ‘mob’ now?
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Wow! Wow! Wow! pic.twitter.com/M1MF3FjegC
">Audience is ‘mob’ now?
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 20, 2023
Wow! Wow! Wow! pic.twitter.com/M1MF3FjegCAudience is ‘mob’ now?
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 20, 2023
Wow! Wow! Wow! pic.twitter.com/M1MF3FjegC
अलीकडेच, पंतप्रधान मोदींनी, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी, चित्रपटांसारख्या अप्रासंगिक मुद्द्यांवर अनावश्यक टिपण्णी केल्याने पक्षाच्या विकासाचा अजेंडा मागे पडतो, अशी सूचना केली होती. याबाबत भारताच्या प्रमुख वृत्त संस्थांनी ही बातमी मोठ्या मथळ्यामध्ये चालवली होती.
जेव्हा तुम्ही गप्प बसता, तेव्हा तुम्ही पूर्वग्रहाला सामर्थ्यवान बनवता आणि तुम्ही द्वेषाला सामर्थ्यवान बनवता. आता ते इतके सशक्त झाले आहे की ती स्वतःमध्ये एक शक्ती आहे. जमाव आता नियंत्रणाबाहेर आहे,असे चित्रपट निर्माते पुढे म्हणाले. यापूर्वी अनेक राजकारणी शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या पठाण गाण्यावर आक्षेप घेत पुढे आले होते. त्यात मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा आणि दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर टीका करणारे राम कदम यांचाही समावेश होता. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत इतर अनेकांनीही चित्रपट आणि त्यातील गाण्याच्या विरोधात होते.
दरम्यान, भारतीय फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे (IFTDA) अध्यक्ष चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांना पंतप्रधान मोदींच्या विधानाचे समर्थन करण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की, 'जर पंतप्रधानांनी स्वत:च्या लोकांची कानउघाडणी केली आणि त्यांना चित्रपट इंडस्ट्री, जे त्यांचे क्षेत्र नाही, त्यांच्या विरोधात मूर्खपणा न बोलण्यास सांगितले, तर ते उद्योगासाठी आत्मविश्वास वाढवणारे आहे. देशाचे पंतप्रधान तुमच्यासोबत आहेत. याचा संकेत केवळ राजकारण्यांनाच नाही तर माध्यमांतील लोकांपर्यंत, स्वतःच्या उद्योगालाही जातो.'
हेही वाचा - महेश कोठारे यांना पितृशोक, ज्येष्ठ अभिनेता अंबर कोठारे यांचे निधन