ETV Bharat / entertainment

Vishals allegations against CBFC : अभिनेता विशालच्या आरोपाने मंत्रालयाला खडबडून जाग, कठोर कारवाईचे दिले आदेश

Vishals allegations against CBFC : तमिळ अभिनेता आणि निर्माता विशालने केंद्रीय सेन्सॉर बोर्डातील काही अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्राच्या बदल्यात साडेसहा लाखाची लाच घेतल्याची तक्रार केली होती. सोशल मीडियावर निवेदन देत त्याने यावर कारवाई करण्याची मागणी पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तातडीने दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

Vishals allegations against CBFC
विशालच्या आरोपाने मंत्रालयाला खडबडून जाग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 4:15 PM IST

नवी दिल्ली - Vishals allegations against CBFC : तमिळ अभिनेता आणि निर्माता विशालने केंद्रीय सेन्सॉर बोर्डातील काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, सरकार भ्रष्टाचाराबद्दल सजग असून अशा गोष्टी खपवून घेणार नाही. तमिळ अभिनेता विशालने 6.5 लाख रुपयांची लाच दिल्याच्या दाव्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याच्या 'मार्क अँटनी' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळवत असताना त्याच्याकडे लाच मागण्यात आल्याचा आरोप विशालने केला होता.

  • The issue of corruption in CBFC brought forth by actor @VishalKOfficial is extremely unfortunate.

    The Government has zero tolerance for corruption and strictest action will be taken against anyone found involved. A senior officer from the Ministry of Information & Broadcasting…

    — Ministry of Information and Broadcasting (@MIB_India) September 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'सीबीएफसी मधील भ्रष्टाचाराचा मुद्दा अभिनेता विशालने पुढे आणला, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारची भ्रष्टाचाराबाबत शून्य सहनशीलता आहे आणि यामध्ये कोणीही गुंतलेले आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. मंत्रालयाने सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटलंय की, 'माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी करण्यासाठी आजच मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे. jsfilms.inb@nic.in या वेब साईटवर सीबीएफसीकडून छळवणुकीच्या इतर कोणत्याही घटनांबद्दल माहिती देऊन मंत्रालयाला सहकार्य करण्याची आम्ही प्रत्येकाला विनंती करतो', असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

  • #WATCH | Mumbai: On Actor Vishal's allegations on CBFC Mumbai, Film Director Ashoke Pandit says, "... There are two names he takes in his statement, M Rajan and Jija Ramdas. As per my knowledge, these two are not the employees of CBFC... Accusing a CBFC officer at this stage is… pic.twitter.com/ZvUnSIKsEU

    — ANI (@ANI) September 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सीबीएफसीचे माजी सदस्य असलेले चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी एएनआयला सांगितले की, '... त्याने आपल्या वक्तव्यात दोन नावं घेतली आहेत, एम राजन आणि जिजा रामदास. माझ्या माहितीनुसार हे दोघेही केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचे कर्मचारी नाहीत. .. त्यामुळे या टप्प्यावर सीबीएफसी अधिकाऱ्यावर आरोप करणं योग्य नाही... पण जर आरोप होत असतील तर आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करतो कारण हे आरोप खूप गंभीर आहेत...लाच मागणारा अधिकारी त्याच्या थेट खात्यात पैसे घेणार हे उघड आहे. विशालनं नाव दिलेल्या या दोन लोकांना विचारले पाहिजे की त्यांनी सीबीएफसीमधून कोणाच्या तरी वतीने पैसे घेतले आहेत का... या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी झाली पाहीजे.'

  • #WATCH | Tamil actor Vishal says, "...This is about the scam that has transpired in CBFC Mumbai in relation to my film (Mark Antony)...I would like to address this to Maharashtra CM Eknath Shinde and PM Modi. We applied online for film certification but we were taken aback by… pic.twitter.com/8RU7x54qNK

    — ANI (@ANI) September 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गुरुवारी अभिनेता विशालने X वर एक व्हिडिओ मेसेज शेअर केला होता.यामध्ये तो म्हणाला की, रुपेरी पडद्यावर दाखवला जाणारा भ्रष्टाचार आपण समजू शकतो आहे, पण खऱ्या आयुष्यात नाही. विशेषत: सरकारी कार्यालयात आणि त्याहून वाईट सीबीएफसीच्या मुंबई ऑफिसमध्ये घडत आहे. माझ्या 'मार्क अँटनी' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या सेन्सॉर सर्टिफिकेटसाठी 6.5 लाच मागण्यात आली होती. या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा -

  1. Ganapath teaser out: टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉनच्या जबरदस्त अ‍ॅक्शनचा थरार, गणपथचा टीझर रिलीज

2. Salaar vs Dunki release clash : सालार विरुद्ध डंकी बॉक्स ऑफिसवर सामना अटळ, प्रभासच्या पोस्टरसह निर्मांत्याची घोषणा

3. Ranbir Kapoor birthday : पाहा, रणबीर कपूरने घराबाहेर चाहत्यांसोबत कसा साजरा केला वाढदिवस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.