ETV Bharat / entertainment

विद्युत जामवालवर फिमेल फॅन फिदा, आलिशान कारमधून घडवली सैर - विद्युतने आलिशान कारमधून घडवली सैर

अभिनेता विद्युत जामवालने त्याच्या महिला फॅनचा दिवस संस्मरणीय बनवला आहे. हा प्रसंग तिच्यासाठी दीर्घकाळ स्मरणात राहणारा आहे. विद्युतने तिला आपल्या ३. ६५ कोटी किंमत असलेल्या आलिशान कारमधून फिरवले आहे.

विद्युत जामवाल
विद्युत जामवाल
author img

By

Published : Jun 18, 2022, 10:42 AM IST

मुंबई - 'कमांडो' फेम अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या माचो लूकसाठी आणि दमदार स्टंट-अ‍ॅक्शनसाठी प्रसिद्ध आहे. चित्रपटातील त्याचे स्टंट खरे आहेत जे तो स्वत: करतो. विद्युतच्या दमदार व्यक्तिमत्त्वावर अनेक मुलीही फिदा आहेत आणि त्याच्या लूकवर मरायला तयार आहेत. विद्युत काही कमी नाही... तो त्याच्या चाहत्यांची मने जिंकण्याची एकही संधी सोडत नाही. आता पाहा, अभिनेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 'तो किता मोठ्या मनाचा माणूस आहे' हे असे दिसून येते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या आलिशान कार 'Aston Martin DB 9' जवळ उभा असल्याचे दिसत आहे. त्याला आपल्या कॅमेर्यात कैद करण्यासाठी आसुसलेल्या हौशी फोटोग्राफर्सना आनंदाने पोज देताना दिसत आहे. तो ज्या गाडीजवळ उभा आहे त्या गाडीची किंमत ३.६५ कोटी इतकी आहे.

चाहत्याला दिलं भरभरून प्रेम - दरम्यान, अभिनेत्याची एक महिला फॅन अचानक त्याच्याकडे आली आणि तिला विश्वासच बसत नव्हता की ती विद्युत जामवालला इतक्या जवळून पाहात आहे. ती सारखी आपली भावना त्याला बोलून दाखवत होती.

आलिशान कारमध्ये फॅनला फिरवले - येथे विद्युत या डायहार्ड फॅनला पुरेपूर समजून घेतो. यावेळी विद्युतने केवळ आपल्या फॅनशी गप्पा मारल्या नाहीत तर तिला प्रेमाची मिठीही मारली. त्या महिला फॅनच्या सांगण्यावरून तिला ब्रँडेड कारमधून लाँग ड्राईव्हवरही नेले. हा व्हिडिओ पाहून चाहते अभिनेत्याची जोरदार प्रशंसा करत आहेत. एका यूजरने 'जम्मू का दिलदार' म्हटले आहे. अनेक चाहत्यांनी अभिनेत्याचे वर्णन गोल्डन हार्ट मॅन म्हणून केले आहे.

८ जुलैला प्रदर्शित होणार विद्युत जामवालचा चित्रपट - विद्युत सध्या त्याच्या आगामी 'खुदा हाफिज-2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कलाकार चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. 'खुदा हाफिज 2' या चित्रपटात विद्युत शिवलिका ओबेरॉय आणि दानिश हुसेनसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 8 जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - रजनीकांत आणि मोहनलालची एके काळची नायिका; ऐश्वर्या आता रस्त्यावर विकते साबण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.