मुंबई - Do Aur Do Pyaar First Look : अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेत्री इलियाना डिक्रूझ अलीकडेच त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चर्चेत होत्या. दरम्यान, 17 जानेवारी रोजी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली. 'दो और दो प्यार' असं या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात विद्या बालन, अभिनेता प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि अभिनेता सेंधिल राममूर्ती मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'दो और दो प्यार' या चित्रपटाच्या घोषणेसोबतच एक पोस्टरही रिलीज करण्यात आले, ज्यामध्ये ही सर्व पात्रे दिसत आहेत. विद्या बालन आणि इलियाना डिक्रूझ यांनी अलीकडेच त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
कधी होणार चित्रपट प्रदर्शित : 'दो और दो प्यार' या चित्रपटाचे निर्माते अॅप्लॉज एंटरटेनमेंट आणि इलिपसिस एंटरटेनमेंट आहेत. हा चित्रपट 29 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन चित्रपट निर्माते श्रीशा गुहा ठाकुरता यांनी केलंय. हा चित्रपट 2017 मध्ये रिलीज झालेल्या 'द लव्हर्स' चित्रपटाच्या काहाणीवर आधारित आहे, ज्यामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटात विद्या बालन आणि सेंधिल राममूर्ती यांच्या जबरदस्त केमेस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
'दो और दो प्यार' फर्स्ट लूक पोस्टर : याशिवाय इलियाना प्रतीक गांधी यांची जोडी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 'दो और दो प्यार' या चित्रपटाच्या फर्स्ट लूकबद्दल सांगायचं तर, सेंधिल राममूर्ती ग्रे शर्टमध्ये तर विद्या बालन मस्टर्ड कलरच्या शर्टमध्ये दिसत आहे. तर, प्रतीक गांधीनं निळ्या कोटखाली राखाडी टी-शर्ट घातला आहे. इलियाना स्काय टॉपमध्ये दिसत आहे. या चित्रपट पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता अनेकजण इलियाना आणि विद्याला या चित्रपटासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. 'दो और दो प्यार'चं पोस्टर हे अनेकांना आवडलंय. इलियानानं बाळाला जन्म दिल्यानंतर ती आता पहिल्यांदाचं रुपेरी पडद्यावर तिच्या चाहत्यांना दिसेल.
हेही वाचा :