मुंबई - लव्हबर्ड्स विकी कौशल आणि कॅटरिना कैफ सध्या न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या सुट्टीचा आनंद घेत आहेत. हे जोडपे इतर कामांमध्येही रमून त्यांची सुट्टी संस्मरणीय बनवत आहे. शनिवारी कॅटरिनाने बॉलिंगमध्ये तिचा हात आजमावला होता. त्याची एक झलक तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विकी कौशलने या विकेंडला आपल्या कॉलेजच्या मिक्रांना भेटणे पसंत केले. रविवारी विकीने त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या महाविद्यालयीन मित्रांसोबतचा एक फोटो पोस्ट केला. पोस्टसोबत त्यांनी लिहिले, "बॅच 2005".
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
याआधी कॅटरिनाने ब्रिटनमधील तिच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये पती विकी कौशलसोबत नाश्ता करतानाचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती पती विकीसोबत खूप आनंदी आणि सुंदर दिसत होती. त्यानंतर हे जोडपे न्यूयॉर्कमधील प्रियंका चोप्राच्या सोना या रेस्टारंटमध्ये पोहोचले होते. या ठिकाणावरील फोटोही दोघांनी शेअर केले होते.
वर्क फ्रंटवर, कॅटरिना ही श्रीराम राघवनच्या आगामी 'मेरी ख्रिसमस' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या थ्रिलरमध्ये तमिळ सुपरस्टार विजय सेतुपती देखील मुख्य भूमिकेत आहे. तिने गुरमीत सिंग दिग्दर्शित 'फोन भूत'चे शूट पूर्ण केले आहे. कॅटरिनासोबत या चित्रपटात अभिनय राज सिंग, जॅकी श्रॉफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर देखील आहेत.
विक्कीबद्दल बोलायचे तर, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्याकडे निर्मितीच्या विविध स्तरांवर अनेक प्रोजेक्ट आहेत. सारा अली खान आणि मेघना गुलजार यांच्या 'सॅम बहादूर'सोबत तो दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्याकडे शशांक खेतानचा 'गोविंदा नाम मेरा' हा चित्रपटही आहे.
विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांनी गेल्या वर्षी ९ डिसेंबरला राजस्थानमध्ये शाही पद्धतीने लग्न केले होते. या लग्नात फक्त खास नातेवाईक आणि जवळचे मित्र पोहोचले होते.
हेही वाचा - सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदाचे अभिनयात पदार्पण, झोया अख्तरने दिली ओळख पाहा व्हिडिओ