मुंबई - मिलिंद सफई यांनी आपल्या अभिनयाने मराठी चित्रपट क्षेत्रात स्वतःची ओळख जपली. मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी ते ठळकपणे ओळखले जातात. शुक्रवारी त्यांचं कॅन्सरनं निधन झालं. मिलिंद यांनी मेकअप, थँक यू विठ्ठला, पोश्टर बॉयझ, छडी लागे छम छम, प्रेमाची गोष्ट, टार्गेट यांसह आदी मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला. (Marathi Actor Milind Safai) (Actor Milind Safai Passes Away)
सिनेसृष्टीत हळहळ - मिलिंद हे एक प्रसिद्ध मराठी कलावंत होते. सफई यांच्या निधनाचं वृत्त कळताच कलाविश्व एका चांगल्या अभिनेत्याला मुकल्याची अनेकांनी व्यक्त केली. मराठीसोबतच मिलिंद यांनी हिंदी कलाविश्वातही महत्त्वपूर्ण योगदान दिलं. अनेक मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचं कौशल्य सिद्ध केलं.
ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी दिली माहिती - मिलिंद सफई हे मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीचे कलावंत होते. मागील काही वर्षांपासून ते कॅन्सर या आजाराचा सामना करत होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते. पण, शुक्रवारी (२५ ऑगस्ट) सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या निधनाची बातमी येताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
जयवंत वाडकर यांची 'ईटीव्ही भारत'ला प्रतिक्रिया - मिलिंद सफाई हा खूपच सेन्सिबल अभिनेता होता. तो चांगला कलाकार होता. त्याने अनेक नाटकं आणि मालिकांमध्ये चांगला अभिनय केला. मिलिंदला मेंदूचा कॅन्सर झाला आणि त्याचं निधन झालं. त्यामुळे मी कायमच सांगत असतो की, आहे तो क्षण सर्वांनी आनंदात जगला पाहिजे. कधी काय होईल हे सांगता येत नाही. मिलिंद वॉज ए फॅन्स्टाटिक आर्टिस्ट! त्याच्या आत्म्याला ईश्वर शांती प्रदान करो, ही प्रार्थना. अशी प्रतिक्रिया जयवंत वाडकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
गुरुवारी सीमा देव यांचं निधन - हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं गुरुवारी (२४ ऑगस्ट) सकाळी निधन झालं होतं. त्या 81 वर्षांच्या होत्या. सीमा देव मागील काही वर्षांपासून अल्झायमर या आगाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी त्यांनी मुंबईतील आपल्य राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. सलग दुसऱ्या दिवशी मराठी कलाविश्व आणखी एका कलावंताला पारखं झालं.
हेही वाचा -