ETV Bharat / entertainment

Vatsal sheth and ishita dutta : वत्सल सेठ आणि इशिता दत्ताचा रुग्णालयाबाहेरचा व्हिडिओ झाला व्हायरल... - चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

टीव्ही सेलिब्रिटी कपल वत्सल सेठ आणि इशिता दत्ता हे नुकतेच आई-बाबा झाले आहेत. इशिताने १९ जुलै रोजी एका मुलाला जन्म दिला. आता इशिताला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Vatsal sheth and ishita dutta
वत्सल सेठ आणि इशिता दत्ता
author img

By

Published : Jul 21, 2023, 5:38 PM IST

मुंबई : टीव्ही सेलिब्रिटी कपल वत्सल सेठ आणि इशिता दत्ता यांनी नुकतेच त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आहे. इशिताने १९ जुलै रोजी एका मुलाला जन्म दिला. गुरुवारी या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या मुलाची झलकही शेअर केली. दरम्यान आता इशिताला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी पापाराझींनी वत्सल सेठ आणि इशिता दत्ताला हॉस्पिटलमधून बाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद केले. या जोडप्याने आपल्या मुलासह पापाराझीसाठी पोझ दिली. नुकतीच आई बनलेल्या इशिताने जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाचा फ्रॉक सूट परिधान केला होता. तर वत्सलने हिरव्या आणि जांभळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट घातली होती.

चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा : पापाराझीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ समोर येताच या जोडप्याच्या चाहत्यांनी त्यांना पालक बनल्याबद्दल शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले, सुंदर जोडप्याचे अभिनंदन. इतर चाहत्यांनी कमेंट विभागात फायर इमोजी आणि अभिनंदन शुभेच्छा दिल्या आहेत. या जोडप्याने गुरुवारी, त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर मुलासह त्यांचे फोटो शेअर केले. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहले गेले 'आम्हाला एका मुलाच्या स्वरूपात आशीर्वाद मिळाला आहे. प्रेम आणि शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार. याबरोबरच या पोस्टवर त्यांनी लाल हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. त्यानंतर या पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्री काजोलने कमेंट सेक्शनमध्ये टाळ्या वाजवणारा इमोजी पोस्ट केला आहे. दरम्यान, जेनिफर विंगेट, कुशल टंडन, अनिता एच रेड्डी, रिद्धिमा पंडित यांसारख्या अनेक टीव्ही स्टार्सनी या जोडप्याचे पालक बनल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

इशिता दत्ताचा बेबी शॉवर : काही दिवसांपूर्वी इशिता दत्ताच्या आईने तिच्यासाठी बेबी शॉवरचे आयोजन केले होते. यावेळी इशिता खूप सुंदर दिसत होती. या कार्यक्रमाचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिच्या या पोस्टला अनेक चाहत्यांनी लाईक केले आहेत.

इशिता दत्ता-वत्सल सेठचे लग्न : इशिता आणि वत्सल शेठने २८ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. या वर्षी ३१ मार्च रोजी, या जोडप्याने गर्भधारणेबाबतची बातमी चाहत्यांनी दिली होती.

हेही वाचा :

  1. Alia Bhatt : भविष्यात राहा कपूर काय बनणार? आलिया भट्टने दिले भन्नाट उत्तर...
  2. anupam kher : अनुपम खेर आणि जया बच्चन यांनी मणिपूर हिंसाचारवर व्यक्त केला आपला संताप...
  3. Ranveer Singh : मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये रणवीर सिंगने पत्नी दीपिका पदुकोणचे घेतले चुंबन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.