ETV Bharat / entertainment

Varun Tej-Lavanya Tripathi engagement : वरुण तेज-लावण्य त्रिपाठी यांचा हैदराबादमध्ये झाला साखरपुडा - चिरंजीवी

अभिनेता वरुण तेज आणि अभिनेत्री लावण्य त्रिपाठी यांचा हैदराबादमध्ये साखरपुडा पार पडला. साखरपुड्यात प्रसिद्ध तेलुगू स्टार्सने आपल्या कुटुंबांसह या कार्यक्रमात हजेरी लावली.

Varun Tej and  Lavanya Tripathi
वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी
author img

By

Published : Jun 10, 2023, 10:26 AM IST

मुंबई : तेलगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध असलेले अभिनेते वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांनी शुक्रवारी हैदराबादमध्ये साखरपुडा केला . या सोहळ्याला वरुणच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित असून यावेळी सेलिब्रिटीमध्ये अल्लू अर्जुन, राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना कोनिडेला याशिवाय मेगास्टार चिरंजीवी उपस्थित होते. वरुणने इंस्टाग्रामवर साखरपुड्यातील फोटो शेअर करत लिहले, 'माझे प्रेम सापडले!' तसेच गेल्या काही दिवसांपासून वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांच्या अफेअरच्या चर्चा होत होत्या. मात्र आता साखरपुडा झाल्यानंतर या चर्चेला पूर्ण विराम भेटला आहे. या दोघांनीही आपले नाते कधीच स्वीकारले किंवा नाकारले नव्हते. बऱ्याच दिवस त्यांनी डेट केल्यानंतर अखेर त्यांनी साखरपुड्याची घोषणा केली.

साखरपुड्याची केली होती घोषणा : साखरपुड्याच्या घोषणेमध्ये त्यांनी लिहिले होते, 'दोन ह्रदये, एक प्रेम. मेगा प्रिन्स वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांचे हार्दिक अभिनंदन, . आयुष्यभर सोबत आनंदात राहण्याच्या तुम्हाला शुभेच्छा. 9 जून 2023. अशी या पोस्टमध्ये तारीख दिली होती. वरुण तेज हा अभिनेता-निर्माता नागेंद्र बाबू यांचा मुलगा आहे. तो चिरंजीवी आणि पवन कल्याण यांचा पुतण्या आहे. लावण्य त्रिपाठीने 2012 मध्ये आलेल्या 'अंदला राक्षसी' या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. वरुण आणि लावण्यने आतापर्यंत दोन चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे.

वरुण तेज आणि लावण्य यांची प्रेमकहाणी : चित्रपटाप्रमाणेच, वरूण तेज आणि लावण्य त्रिपाठी पहिल्यांदाच मिस्टर (2017) च्या सेटवर एकमेकांना भेटले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि अखेरीस त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. अशा प्रकारे, त्यांनी डेटिंग सुरू केली. मात्र, दोघांनी आपले नाते गुपित ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वरुणने लावण्यच्या वाढदिवच्या दिवशी 15 डिसेंबरला तिला लग्नाचा प्रस्ताव देऊन त्यांचे नाते पुढच्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही स्टार्सनी आपापल्या पालकांशी बोलून त्यांच्या लग्नाला मान्यता घेतली. ते आतापर्यंत त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगून होते. आता लवकरच दोघे लग्नबंधनात अडणार आहे.

हेही वाचा :

  1. Om Raut kissing Kriti Sanon : तिरुपती मंदिरात क्रिती सेनॉनचे चुंबन यावर दीपिका चिखलियाची प्रतिक्रिया
  2. Animal release postponed :'अ‍ॅनिमल'चे रिलीज लांबणीवर; 'गदर-2' आणि 'ओएमजी २'ची होणार बॉक्स ऑफिसवर टक्कर
  3. Parineet and Raghav wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा या ठिकाणी करणार आहे लग्न जाणून घ्या...

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.