मुंबई - वरुण धवन आणि कियारा अडवाणी त्यांच्या आगामी 'जुग जुग जीयो' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. या दोघांनी नुकतेच त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मेट्रोमधून प्रवास करीत लोकांची मने जिंकली. अनिल कपूर सोबत, कियारा आणि वरुण हे मुंबई मेट्रोने प्रवास करताना दिसले.
एका व्हिडिओमध्ये, हे दोघे मेट्रोच्या आत वडापावचा आस्वाद घेताना दिसत आहेत. यात ते अस्सल मुंबईकर वाटत होते. किंबहुना, वरुणला त्याचा मेट्रोचा छोटासा प्रवास खरोखरच आवडला. तो म्हणाला की गर्दीच्या वेळेत वेळ वाचवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मेट्रोने प्रवास करणे. वरुणने इनफॉर्मल गुलाबी टी-शर्ट आणि डेनिम घातला होता तर कियारा पांढर्या टँक टॉपमध्ये सुंदर दिसत होती.
'जुग जुग्ग जीयो' 24 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चित्रपटातील 'नच पंजाबन' या गाण्यानेही अलीकडे इन्स्टाग्रामवर बरीच चर्चा घडवून आणली आहे आणि अनेक कलाकारांनी या गाण्यावर नाचतानाचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत.
वरुण धवन, अनिल कपूर आणि कियारा अडवाणी यांच्याशिवाय या चित्रपटात नीतू कपूर यांच्याही भूमिका आहेत. रिअॅलिटी टीव्ही स्टार वरुण सूदही या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहे. धर्मा प्रॉडक्शन आणि Viacom18 स्टुडिओद्वारे निर्मित, कौटुंबिक चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे.
हेही वाचा - बहुप्रतीक्षित नेत्रदिपक 'ब्रम्हास्त्र'चा चित्तथरारक ट्रेलर लॉन्च