ETV Bharat / entertainment

ऋषभ पंतला रुग्णालयात भेटली उर्वशी रौतेला? चर्चेला उधाण, इंटरनेटवर खळबळ - Users criticized Urvashi Rautela mother

ऋषभ पंत मुंबईच्या कोकिलाबेन धिरुबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, त्या हॉस्पिटलचा फोटो अचानक उर्वशी रौतेलैाने इन्स्टा स्टोरीवर शेअर केल्यामुळे इंटरनेटवर वादळ निर्माण झाले आहे. अनेकजण उर्वशीला ट्रोल करत आहेत.

ऋषभ पंतला रुग्णालयात भेटली उर्वशी रौतेला?

author img

By

Published : Jan 6, 2023, 10:10 AM IST

Updated : Jan 9, 2023, 2:35 PM IST

मुंबई - ऋषभ पंत ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, त्या हॉस्पिटलचा फोटो अचानक उर्वशी रौतेलैाने इन्स्टा स्टोरीवर शेअर करणं लोकांच्या समजण्यापलीकडचं आहे. युजर्सना खात्री आहे की उर्वशी हॉस्पिटलमध्ये क्रिकेटरला भेटली आहे. उर्वशी रौतेला कुठेही जाते, ती काहीही पोस्ट करते, यूजर्स अनेकदा ऋषभ पंतच्या नावाने अभिनेत्रीला ट्रोल करतात.

उर्वशी रौतेलाने इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेला फोटो

ऋषभ पंतमुळे बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्वशीने गुरुवारी इंस्टा स्टोरीवर मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा एक फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर केल्यानंतर लोक असा अंदाज लावत आहेत की उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेली होती.

काय आहे उर्वशीची पोस्ट? - आता उर्वशी खरोखरच ऋषभ पंतला भेटली की नाही, याचा स्पष्ट खुलासा झालेला नाही. पण ऋषभ पंत ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे, त्या हॉस्पिटलचा फोटो अचानक उर्वशीने इन्स्टा स्टोरीवर शेअर करणं लोकांच्या समजण्यापलीकडचं आहे. युजर्सना खात्री आहे की उर्वशी हॉस्पिटलमध्ये क्रिकेटरला भेटली आहे. एकदा ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी आली होती. पण दोघांनीही हे नातं कधीच स्वीकारलं नाही. याउलट दोघांचे शीतयुद्ध सोशल मीडियावर चर्चेत राहिले होते.

  • This is simply mental harassment or does she need a Psychiatrist?
    If in place of her #RishabhPant did something like this he would have been behind the bars and rn everyone would have been walking with placards
    Do men don't have Rights?#UrvashiRautela
    Cheap publicity pic.twitter.com/sf13e5RfQg

    — KARTIK VIKRAM (@iamkartikvikram) January 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उर्वशी झाली ट्रोल - उर्वशी रौतेला कुठेही जाते, ती काहीही पोस्ट करते, यूजर्स अनेकदा ऋषभ पंतच्या नावाने अभिनेत्रीला ट्रोल करतात. उर्वशी रौतेलाच्या अनेक पोस्ट्सवरून असे दिसते आहे की ती स्वतः ट्रोल्सना तिला फॉलो करण्यासाठी आमंत्रित करते. आता तिने रुग्णालयाचा फोटो पोस्ट केल्याने हा तिचा प्रसिध्दीसाठीचा सवंग प्रयत्न असल्याचे लोक म्हणू लागले आहेत.

उर्वशी रौतेलाच्या आईवर युजर्सची टीका - ऋषभ पंतच्या नावाने उर्वशीला ट्रोल केले जात होते, लोकांनी उर्वशीच्या आईलाही टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेत्रीच्या आईने ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करणारी पोस्ट शेअर केली आहे. हे पाहिल्यानंतर लोकांनी त्याची आई मीरा रौतेला यांना ट्रोल करणे थांबवले नाही.

मीरा रौतेलाने ऋषभ पंतसाठी लिहिले की, 'एकीकडे सोशल मीडियावर अफवा आणि दुसरीकडे तू निरोगी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तराखंडचे नाव रोशन करत आहेस. सिद्धबलीबाबा तुमच्यावर विशेष आशीर्वादाची वर्षाव करोत. तुम्ही सर्वांनीही प्रार्थना करावी. तिच्यावर टीका झाल्यावर उर्वशीच्या आईनेही त्याला सडेतोड उत्तर दिले. त्यांनी लिहिलं होतं- जर आपल्याला स्वतःची किंमत कळली तर इतरांची निंदा आपल्याला स्पर्शही करू शकत नाही.

Last Updated : Jan 9, 2023, 2:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.