ETV Bharat / entertainment

उर्वशी रौतेलाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल - उर्वशी रौतेलाचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

Urvashi Rautela : अभिनेत्री उर्वशी रौतेलानं एक फोटो सोशल मीडिया पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती खूप खास दिसत आहे. याशिवाय उर्वशीच्या आईनं काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

Urvashi Rautela
उर्वशी रौतेला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 7:22 PM IST

मुंबई - Urvashi Rautela : अभिनेत्री उर्वशी रौतेला ही कायम चर्तेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. उर्वशी रौतेला सोशल मीडियावर अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. दरम्यान तिनं गुलाबी सॉलिड स्लिम-फिट कॅमी बॉडीसूटमध्ये हिरव्या हँडबॅगसह एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिनं काळा सनग्लास लावला आहे. उर्वशी रौतेला आणि तिची आई मीरा रौतेला सध्या दुबईला आहेत. दरम्यान उर्वशीनं तिच्या बोल्ड आउटफिट्सनं सोशल मीडियावर अनेकदा खळबळ उडवून दिली आहे. याशिवाय उर्वशीची आई मीरा रौतेला यांनी दुबईतील बुर्ज अल अरबसमोरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत उर्वशी डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओंमध्ये उर्वशी चमकदार हॉट गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये 'पहाडी' गाण्यावर डान्स करत आहे.

उर्वशी रौतेलाचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल : दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये उर्वशीची आई 'आपकी नजरों ने समझा प्यार के कबिल हमे' हे गाणे गात आहे. याशिवाय या व्हिडिओमध्ये उर्वशी जोरजोरात हसत आहे. त्यानंतर तिची आई तिला म्हटते 'अरे यार, तू पहाडी गाण्यावर डान्स कर' मीरा रौतेला ब्लॅक आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओंवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरनं या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, 'मनाला भिडणारा व्हिडिओ आहे, खूप सुंदर दिसत आहात'. दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, 'तुमच नृत्य अप्रतिम आहे'. त्यानंतर आणखी एका चाहत्यानं लिहिलं, 'आई आणि मुलगी खूप सुंदर दिसत आहे'. याशिवाय व्हिडिओमध्ये रेड हार्ट इमोजी शेअर करून आई-मुलीच्या जोडीला बहिणी वाटत असल्याचं म्हटलं आहे.

उर्वशी रौतेलाचा आगामी चित्रपट : उर्वशी रौतेला वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालं तर ती 'ब्लॅक रोज', या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये ती अमित गुप्ता, जयशंकर त्रिपाठी यांच्याबरोबर झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अज्ञाताबॅनर खाली केली आहे. हा चित्रपट 08 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

हेही वाचा :

  1. 'अ‍ॅनिमल'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला जबरदस्त वेग; रणबीर कपूरच्या चित्रपटानं रिलीजपूर्वी केली 20 कोटीची कमाई
  2. अभिनेता रणदीप हुड्डा लिन लैश्रामसोबत विवाहबद्ध; आंतरजातीय विवाह केल्यामुळं झाला ट्रोल
  3. इम्फाळमध्ये रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम यांचा पारंपारिक पद्धतीनं विवाह सोहळा पडला पार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.