ETV Bharat / entertainment

Urfi Javed receives death threat : उर्फी जावेदला जीवे मारण्याची मिळाली धमकी ; शेअर केली पोस्ट - उर्फी जावेद

Urfi Javed receives death threat : उर्फी जावेदनं काही दिवसापूर्वी 'भूल भुलैया' चित्रपटातील राजपाल यादवसारखा 'छोटा पंडित'चा गेटअप केला होता. ही फॅशन करणं तिला चांगलंच महागात पडलंय. तिला आता जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.

Urfi Javed receives death threat
उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 10:18 AM IST

मुंबई - Urfi Javed receives death threat : उर्फी जावेद तिच्या विचित्र कपड्यांमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते, परंतु यावेळी तिच्या विचित्र कपड्यांमुळे ती अडचणीत आली आहे. यावेळी तिला फॅशन करणं चांगलंच महागात पडले असून तिला पोलीस ठाण्यातही जावं लागलं आहे. आपल्या कपड्यांच्या डिझाईन आणि नवीन फॅशननं स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या उर्फी जावेदला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. तिला हॅलोविनसाठी डिझाइन केलेल्या तिच्या एका पोशाखामुळे धमकी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिनं 'भूल भुलैया' चित्रपटातील राजपाल यादवसारखा 'छोटा पंडित'चा गेटअप केला होता.

  • I’m just shocked and appalled by this country mahn , I’m getting death threats in recreating a character from a movie where as that character didn’t get any backlash :/ pic.twitter.com/pOl9FvTYzT

    — Uorfi (@uorfi_) October 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उर्फी जावेदला मिळाली धमकी : उर्फीचा हा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर तिला अज्ञात व्यक्तीनं ईमेल करून धमकी दिली आणि तिला व्हिडिओ हटवण्यास सांगितले. हा व्हिडिओ डिलीट न केल्यास तिला ठार मारले जाईल, असेही धमकी दिली आहे. हा ईमेल मिळाल्यानंतर उर्फीने मुंबई पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर तिनं एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. उर्फीला दोन वेगवेगळ्या ईमेल आयडीवरून ईमेल आले आहेत. पहिला ईमेल तिला निखिल गोस्वामी नावाच्या ईमेल आयडीवरून आला होता. या ईमेलमध्ये असं होत. 'तुम्ही अपलोड केलेला व्हिडिओ डिलीट करा, नाहीतर तुम्हाला मारायला वेळ लागणार नाही'. त्यानंतर तिला दुसरा ईमेल आला, जो रुपेश कुमार नावाच्या व्यक्तीच्या मेल आयडीवरून आला होता. या मेलमध्ये असं लिहलं होत, 'उर्फी जावेद आमच्या हिंदू धर्माची बदनामी करत आहे, तुझे जीवन जग, मी तुला चौकात गोळ्या घालीन' असं या ईमेलमध्ये आहे.

उर्फीनं केली पोस्ट शेअर : उर्फीनं सोशल मीडियावर लिहिलं की, 'मला या देशात धक्का बसला आहे आणि भयभीत झाले आहे, चित्रपटातील पात्र पुन्हा साकारण्यासाठी मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या व्यक्तिरेखवर वाईट प्रकाशात टाकले जात आहे'. उर्फीनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केली होता, ज्यामध्ये तिनं 'भूल भुलैया'च्या 'छोटा पंडित'सारखाच गेटअप केला होता. हा व्हिडिओ पोस्ट करत तिनं लिहलं, 'पाणी! मला आशा आहे की छोटा पंडित हे 'भूल भुलैया' मधील एक पात्र आहे हे सर्वांना माहित असेल'. तिने हॅलोविन पार्टीसाठी खूप चांगली तयारी केली होती, पण ती जाऊ शकली नाही, म्हणून तिनं हा व्हिडिओ पोस्ट केला होता.

हेही वाचा :

  1. Fighter Last Shoot : हृतिक रोशन स्टारर 'फायटर' चित्रपटाचं शूटिंग लवकरच होणार पूर्ण...
  2. Kennedy received a standing ovation : 'मामी'मध्ये सनी लिओनीच्या 'केनेडी'ला मिळाले स्टँडिंग ओव्हेशन!
  3. Angad Bedi dedicates gold medal : अंगद बेदीनं अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदक वडील बिशन सिंग बेदींना केलं समर्पित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.