मुंबई - मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूविरोधात ( Miss Universe Harnaz Sandhu ) चंदीगड जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. पंजाबी अभिनेत्री उपासना सिंग हिने मिस युनिव्हर्स हरनाज संधूविरोधात दिवाणी दावा दाखल केला आहे. वकील करण सचदेवा आणि इर्वनीत कौर यांच्यामार्फत मिस युनिव्हर्सविरोधात कोर्टात ही याचिका दाखल केली असून, कराराचा भंग आणि नुकसानीचा दावा केला आहे.
उपासना सिंग या 'बाई जी कुटणगे' या चित्रपटाची निर्मात्या आहेत. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून हरनाज संधूने करार केला होता. पण आता हरनाजने बोलणे बंद केले आहे. ती तिचा फोनही उचलत नाही आणि कोणत्याही मेल आणि मेसेजला उत्तर देत नाही.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पंजाबी अभिनेत्री उपासना सिंगने सांगितले की, हरनाज संधूने 2020 मध्ये फेमिना मिस इंडिया पंजाबचा किताब जिंकला. त्यानंतर हरनाझने उपासना सिंगच्या संतोष एंटरटेनमेंट स्टुडिओ एलएलपीसोबत कलाकार करार केला होता. या करारानुसार हरनाजला बाई जी कुटणगे या चित्रपटात मुख्य भूमिका देण्यात आली होती. करारानुसार, हरनाजला चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये स्वतः प्रत्यक्षपणे सहभागी व्हायचे होते. पण 2021 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर हरनाज संधूने कराराच्या अटी पूर्ण केल्या नाहीत.
उपासना सिंह म्हणते की, मिस युनिव्हर्स बनल्यानंतर हरनाज संधूने स्वतःला मोठी स्टार समजायला सुरुवात केली आहे. हरनाज संधू संपर्कात नसल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला आहे. यामुळे, तिला चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील बदलावी लागली. यापूर्वी हा चित्रपट 27 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता तो 19 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्यामुळे तिला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली आहेत.
हेही वाचा - 'हर घर तिरंगा' अँथम व्हिडिओत अमिताभ बच्चन, प्रभाससह झळकले तारे तारका पाहा व्हिडिओ