ETV Bharat / entertainment

Alia Bhatt Photo : आलिया भट्ट फोटो लीक प्रकरणी मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास सांगितले

author img

By

Published : Feb 22, 2023, 6:57 AM IST

Updated : Feb 22, 2023, 2:35 PM IST

दोन अज्ञात व्यक्तींनी आलिया भट्टचे फोटो तिच्या परवानगी शिवाय क्लिक करत सोशल मीडियावर शेअर केले. आलियाने स्वत: या घटनेची माहिती तिच्या इंस्टाग्राम स्टोरीज मार्फत शेअर केली आहे. आलियाने याप्रकरणी मुंबई पोलिसांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे.

Alia Bhatt
आलिया भट्ट

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या घराच्या बाल्कनीत बसलेली असताना दोन अज्ञात व्यक्तींनी गुप्तपणे तिचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले. त्या व्यक्तींनी आलियाचे फोटो तिच्या परवानगीशिवाय क्लिक केले आणि ते सोशल मीडियावर शेअर देखील केले. याची माहिती खुद्द आलियाने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. फोटोंमध्ये असे दिसते की, आलिया तिच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीत बसली होती आणि तिच्या संमतीशिवाय तिचे फोटो क्लिक केले गेले.

मुंबई पोलिसांकडे तक्रार : आलिया भट्टने तिच्यासोबत घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती इंस्टाग्राम स्टोरीज मार्फत शेअर केली आहे. तिने लिहिले की, 'दुपारी मी माझ्या घरी बसले होते. तेव्हा मला कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे असे वाटले. मी वर बघितले तर मला शेजारच्या इमारतीच्या छतावर दोन लोक कॅमेरा घेऊन असलेले दिसले. हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे. याला परवानगी आहे का? हे एखाद्याच्या गोपनीयतेवर आक्रमण आहे. एक मर्यादा असते जी तुम्ही ओलांडू नये. पण, आज तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मुंबई पोलीसांनी कृपया मदत करावी. या सोबत आलियाने त्या साईटने पोस्ट केलेले फोटो देखील शेअर केले आहेत.

अर्जुन कपूरचे आलियाला समर्थन : आलियाने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केल्यानंतर अभिनेता अर्जुन कपूर आणि तिची बहीण शाहीन भट्ट तिच्या समर्थनार्थ पुढे आले. अर्जुनने आलियाची इन्स्टाग्राम स्टोरी पुन्हा शेअर केली आणि लिहिले, 'हा एकदम निर्लज्जपणा आहे. येथे सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी तर सोडा आता महिला त्यांच्या घरातही सुरक्षित नाहीत. स्वत:च्या फायद्यासाठी एखाद्या सार्वजनिक व्यक्तीचे फोटो काढणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हे माहित असणे आवश्यक आहे की असे करणे निंदनीय आहे. हे एखाद्याचा पाठलाग करण्यासारखेच आहे'. या पोस्ट मध्ये त्याने मुंबई पोलिसांना देखील टॅग केले आहे.

विराट सोबतही असे झाले आहे : सेलिब्रेटींच्या गोपनीयतेचे उल्लंघन होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी रणबीर आणि आलियाने मीडियाला त्यांच्या नवजात बाळाचे फोटो क्लिक करू नका असे सांगितले होते. गेल्या वर्षी भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत देखील असेच काहीसे घडले होते. एका चाहत्याने विराटच्या हॉटेलच्या खोलीत घुसून खोलीचा गुपचूप व्हिडिओ बनवला होता. केवळ विराटच नाही तर त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही या प्रकरणी नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा : Hera Pheri 3 Shoot Begins : 'हेरा-फेरी 3'चे शूटिंग सुरू; अक्षय कुमार चित्रपटात आहे की नाही घ्या जाणून

Last Updated : Feb 22, 2023, 2:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.