ETV Bharat / entertainment

Ajay Devgn and Kichha Twitter War : हिंदी भाषेवर केलेल्या टिप्पणीनंतर अजय देवगण आणि किच्चा सुदिप यांच्यात ट्विटर युध्द

दक्षिणेकडील स्टार किच्चा सुदीप याने हिंदी यापुढे भारताची राष्ट्रभाषा नसल्याबद्दल केलेल्या कॉमेंटनंतर अजय देवगणचे सुदिपसोबत शाब्दिक चकमक उडाली आहे. आपल्या वाक्याचा चुकीचा संदर्भ अजयने घेतल्याचे किच्चाने म्हटलंय. तर अनेक ट्विटनंतर अजयने या वादावर पडदा टाकला आहे.

अजय देवगण आणि किच्चा ट्विटर वॉर
अजय देवगण आणि किच्चा ट्विटर वॉर
author img

By

Published : Apr 28, 2022, 2:19 PM IST

नवी दिल्ली - बॉलीवूड अभिनेता अजय देवगण त्याचा आगामी चित्रपट 'रनवे 34' च्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान दक्षिणेकडील स्टार किच्चा सुदीप याने हिंदी यापुढे भारताची राष्ट्रभाषा नसल्याबद्दल केलेल्या कॉमेंटनंतर अजय देवगणचे सुदिपसोबत शाब्दिक चकमक उडाली आहे.

सुदीप म्हणाला होता की, पॅन इंडिया चित्रपट कन्नडमध्ये बनत आहेत, मला त्यावर एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. बॉलिवूडमध्ये आज पॅन इंडिया चित्रपट बनत आहेत. ते तेलुगू आणि तमिळ चित्रपटांचे रिमेक बनवत आहे, पण असे असूनही त्यांना संघर्ष करावा लागत आहे. आज आम्ही ते चित्रपट बनवत आहोत जे जगभरात पाहिले जात आहेत, असे विधान त्याने केले होते. यानंतर चांगलाच गदारोळ माजला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका कार्यक्रमादरम्यान सुदीपने सांगितले की, "हिंदी ही आता राष्ट्रभाषा नाही." यानंतर देवगणने त्याच्या ट्विटर हँडलवर सुदीपच्या कॉमेंटवर आपले मत व्यक्त केले.

अजय देवगण आणि किच्चा सुदिप यांच्यात ट्विटर युध्द

हिंदीत त्यांनी लिहिले, "किच्चा सुदीप, माझ्या भावा, तुझ्या मते, जर हिंदी आपली राष्ट्रभाषा नसेल तर तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता? हिंदी ही आमची मातृभाषा व राष्ट्रभाषा होती, आहे आणि कायम राहील. जन गण मन."

अजय देवगणच्या या ट्विटनंतर लगेचच, सुदीपने असे लिहून प्रतिसाद दिला, "हॅलो अजय देवगण सर..मी हे वाक्य बोललो ते पूर्णतः वेगळ्या संदर्भात होते, माझ्या अंदाजानुसार तुमच्यापर्यंत ते पोहोचले आहे. मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यावर हे विधान का केले याबाबत कदाचित सांगेन. हे कुणालाही दुखावण्यासाठी, चिथावणी देण्यासाठी किंवा वादविवाद सुरू करण्यासाठी नव्हते. मी असे का करू सर."

"मला आपल्या देशाच्या प्रत्येक भाषेवर प्रेम आणि आदर आहे सर. मी अगदी वेगळ्या संदर्भात म्हटल्याप्रमाणे, मला हा विषय थांबवायचा आहे, तुम्हाला नेहमीच खूप प्रेम आणि शुभेच्छा. तुम्हाला लवकरच भेटण्याची अपेक्षा आहे," असेही किच्चा सुदिप पुढे म्हणाला.

पुढे स्पष्टीकरण देताना, सुदीप पुढे म्हणाला, "आणि सर अजय देवगण सर, तुम्ही हिंदीत पाठवलेला मजकूर मला समजला. त्याचे कारण म्हणजे आम्ही सर्वांनी हिंदीचा आदर केला आहे, प्रेम केले आहे आणि शिकलो आहे. काही हरकत नाही सर,,,, पण जर माझा प्रतिसाद कन्नडमध्ये टाईप केला असा तर परिस्थिती काय काय झाली असती याचा विचार करुन आश्चर्य वाटते.!! सर आपणही भारतीय आहोत ना."

सुदीपाची बाजू ऐकून अजय देवगणने "गैरसमज दूर केल्याबद्दल" त्याचे आभार मानले.

त्याने ट्विट केले, "हाय किच्चा सुदिप, तू मित्र आहेस. गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद. मी नेहमीच चित्रपट उद्योगाचा एकच विचार केला आहे. आम्ही सर्व भाषांचा आदर करतो आणि प्रत्येकाने आमच्या भाषेचाही आदर करावा अशी आमची अपेक्षा आहे. कदाचित, काहीतरी भाषांतरात हरवले होते. "

"अनुवाद आणि व्याख्या हे दृष्टीकोन आहेत सर. संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्याशिवाय प्रतिक्रिया न देण्याचे कारण आहे. मी तुम्हाला दोष देत नाही अजय देवगण सर. कदाचित, सृजनशील कारणासाठी तुमचे एक ट्विट मिळाले असते तर हा आनंदाचा क्षण ठरला असता. प्रेम आणि अभिवादन," असी प्रतिक्रिया अखेर सुदीपने दिली आहे.

वर्क फ्रंटवर अजयने अलीकडेच त्याच्या 'भोला' चित्रपटावर काम सुरू केले आहे. हा हिट तमिळ चित्रपट 'कैथी'चा हिंदी रिमेक असेल. हा चित्रपट 30 मार्च 2023 रोजी रिलीज होणार आहे आणि त्यात तब्बू देखील एका सुपर-कॉपच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

हेही वाचा - HBD Samantha : 'ऊं अंटावा' फेम सामंथा रुथ प्रभुचे दिलखेचक फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.