ETV Bharat / entertainment

'तुझसे नाराज नहीं जिंदगी' फेम गायक अनूप घोषाल यांचं निधन, ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 11:01 PM IST

Anup Ghoshal : 'मासूम' चित्रपटातील 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' या सुपरहिट गाण्याला आपला सुरेल आवाज देणारे गायक अनुप घोषाल याचं शुक्रवारी निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते.

Anup Ghoshal
Anup Ghoshal

कोलकाता Anup Ghoshal : बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक अनूप घोषाल यांचं निधन झालं. वयाच्या ७७ व्या वर्षी अनुप यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अनूप घोषाल हे दीर्घकाळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांशी झुंजत होते.

कोलकाता येथे अखेरचा श्वास घेतला : 'मासूम' चित्रपटातील 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' या सुपरहिट गाण्याला आपला सुरेल आवाज देणारे अनुप घोषाल यांच्या निधनामुळे सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. अनूप घोषाल यांनी १५ डिसेंबर रोजी कोलकाता येथे अखेरचा श्वास घेतला. अनूप वृद्धापकाळाच्या समस्यांशी झगडत होते. अवयव निकामी झाल्यानं शुक्रवारी दुपारी १.४० वाजता त्यांचा मृत्यू झाला. अनुप यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबावर आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

'मासूम' चित्रपटासाठी स्मरणात ठेवलं जाईल : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायकांच्या यादीत अनुप घोषाल यांचे नाव नेहमीच समाविष्ट असेल. अनूपला यांना 1983 मधील अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि अभिनेत्री शबाना आझमी अभिनीत 'मासूम' चित्रपटासाठी नेहमीच स्मरणात ठेवले जाईल. या बंगाली गायकाने या चित्रपटातील 'तुझसे नाराज नही जिंदगी' या गाण्याला आपला जादूई आवाज दिला होता. अनूप घोषाल यांचे हे सदाबहार गाणे आजही लोकांना ऐकायला आवडते.

राजकारणातही सक्रिय राहिले : अनूप घोषाल यांचे नाव केवळ गायनानेच नव्हे, तर राजकारणातही गाजले होते. 2011 मध्ये, अनुप यांनी तृणमूल काँग्रेसच्या वतीने पश्चिम बंगालमधील उत्तरपारा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अनूप घोषाल यांच्या कुटुंबात दोन मुली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.