ETV Bharat / entertainment

Tripti Dimri cryptic post : तृप्ती डिमरीच्या गुढ पोस्टमुळे अनुष्काचा भाऊ कर्णेश शर्मासोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चेला उधाण - Anushka Sharmas brother Karnesh Ssharm

अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि चित्रपट निर्माते कर्णेश शर्मा यांच्या कथित प्रणयला पूर्ण विराम मिळाल्याचे सांगितले जात आहे. बुलबुलसाठी एकत्र काम करताना जवळ आलेल्या तृप्ती आणि कर्णेश यांच्या नात्यात आता दरी निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. तृप्तीच्या लेटेस्ट पोस्टमुळे यावर फॉलोअर्स शिक्कामोर्तब करत आहेत.

Tripti Dimri cryptic post
तृप्ती डिमरीची गुढ पोस्ट
author img

By

Published : Jul 1, 2023, 4:45 PM IST

मुंबई - अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा डेट करत होते, याची अनेक वेळा चर्चा पाहायला आणि आकायला मिळाली. कर्णेश हा चित्रपट निर्माता आहे. त्याचे आणि तृप्ती डिमरीचे ब्रेकअप झाल्याची आता नवीन चर्चा आहे. दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर तृप्तीने सोशल मीडियावर एक गुढ पोस्ट लिहिली आहे.

Tripti Dimri cryptic post
तृप्ती डिमरीची गुढ पोस्ट

२०२० मध्ये रिलीज झालेल्या सुपरनॅचरल थ्रिलर बुलबुल चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान काम करताना तृप्ती आणि कर्णेश यांच्यात जवळीक वाढल्याचं म्हटलं जातं. हा चित्रपट तिच्यासाठी फिल्म इंडस्ट्रीची दारे उघडणारा होता. अनुष्का शर्मा आणि कर्णेश शर्मा या बहिण भावंडांनी निर्माण केलेला हा चित्रपट केल्यानंतर काला या चित्रपटाची निर्मितीही केली. यातही तृप्तीची भूमिका होती. या चित्रपटाचे समीक्षकांनी भरपूर कौतुक केले. तृप्ती आणि क्रणेश शर्मा यांनी आपण नात्यात असल्याची कधीच कबुली दिलेली नाही. परंतु सोशल मीडियावर त्यांचे फोटो पाहून फॉलोअर्सनी दोघांच्यात डेटिंग सुरू असल्याची चर्चा सुरू केली.

गेल्या काही दिवसांपासून, तृप्ती डिमरी आणि कर्णेशच्या प्रेमभंगाच्या बातम्या वेबलॉइड्सवर येत आहेत. त्यांच्या सोशल मीडियावरील देवघेवीच्या आधारिवर या कथित जोडप्याने विभक्त होण्याच्या मार्गाची पुष्टी केली आहे, तर तृप्तीच्या नवीन इंस्टाग्राम स्टोरीने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. तृप्तीने आपल्या गुढ पोस्टमध्ये एक कोट लिहिला असून तिने म्हटलंय, 'तुम्ही काहीही केले तरी लोक तर बोलतच राहणार, त्यामुळे तुम्हाला ज्याच्यात आनंद मिळतोय तेच करा'.

अनेक रिपोर्ट्सनुसार, दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले. कर्णेशने त्यांच्या बब्बूल आणि कला या यशस्वी चित्रपटांमधील तृप्तीच्या व्यक्तिरेखेचे पोस्टर काढून टाकल्याचे सांगितले जात असताना, तृप्तीने सोशल मीडियावरून कथित प्रियकर कर्णेश शर्मासोबतचे तिचे सर्व फोटो हटवले आहेत.

दरम्यान, तृप्ती पुढे संदीप रेड्डी वंगा यांच्या आगामी 'अ‍ॅनिमल' चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. तिच्याकडे आनंद तिवारी दिग्दर्शित मेरे मेहबूब मेरे सनम या चित्रपटात विकी कौशल आणि एमी विर्क यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा -

१. Houseful 5 Announcement : हाऊसफुल ५च्या घोषणेनंतर, अक्षय कुमार कुटुंबासह सुट्टीवर अज्ञात स्थळी रवाना

२. Mukhesh ambani gifted gold cradle : मुकेश अंबानीने राम चरणच्या मुलीला १ कोटी रुपयांचा सोन्याचा पाळणा दिला भेट

३. Kangana in strapless outfit : कंगना रणौतने पार्टीत घातला स्ट्रॅपलेस ड्रेस, नेटिझन्सने दाखवला दुपट्टीपणाचा आरसा

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.