ETV Bharat / entertainment

मुक्ता बर्वेची साहसी भूमिका असलेल्या 'वाय' या थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज - Nandu Madhav upcoming movie

'वाय' या आगामी थरराक चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर रिलीज झाला आहे. वास्तवाचा थरार दाखवणारा आणि कल्पनेच्या पलीकडील 'ती' च्या लढ्याची गोष्ट सांगणारा 'वाय' २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

'वाय' या थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
'वाय' या थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
author img

By

Published : Jun 13, 2022, 3:30 PM IST

मुंबई - 'वाय' या आगामी थरराक चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर रिलीज झाला आहे. यात मुक्ता बर्वे एका साहसी भूमिकेत दिसत असून दर महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी होणाऱ्या खुनी घटनांचा उलगडा करण्यासाठी ती एक धाडसी पाऊल उचलताना दिसते.

अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित 'वाय' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोशल मिडीयावर सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वेशिवाय प्राजक्ता माळी, नंदू माधव, सुहास शिरसाट यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘वाय’ एक दमदार कथा आणि आशय घेऊन प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे दिसत आहे. चित्रपटाच्या 'वाय' या शिर्षकाच्या पार्श्वभागी असणाऱ्या 'Y' या इंग्रजी अक्षरामुळे ही चित्रपटाच्या आशय आणि विषयाबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित वास्तवाचा थरार दाखवणारा आणि कल्पनेच्या पलीकडील 'ती' च्या लढ्याची गोष्ट सांगणारा 'वाय' २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - न्यासा देवगणचा लंडनच्या पार्कमधील फोटो व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.