मुंबई - Best Indian Horror Films : साऊथ ते बॉलिवूडच्या हॉरर चित्रपटांनी हॉलिवूडला जवळजवळ प्रत्येक शैलीत टक्कर दिली आहे. हॉरर चित्रपटांबद्दल विचार केला तर मनात भीतीदायक दृश्ये येतात. बॉलिवूड आणि साऊथमध्ये असे अनेक चित्रपट आहेत. हे चित्रपट खूप भितीदायक आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
भूतकालम : मल्याळम चित्रपट 'भूतकालम' 2022 मध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कहाणी भुतांभोवती फिरते. कॉलेज पास झालेला विनू (शेन निगम) त्याची आई आशा (रेवती) आणि आजी हे भुतांनी पछाडलेल्या घरात राहत असते. त्याची आई ही शाळेत शिक्षिका असते. त्याची आजी ही आजारी असते. त्यामुळे तिला बराच वेळा घरात एकट राहवं लागतं. जेव्हा विनूची आजी झोपेतच मरण पावते, तेव्हा विनूच्या आयुष्यात गोंधळ उडतो. रात्रभर त्याला विचित्र रडण्याचा आवाज आणि विचित्र गोष्टींचा सामना करावा लागतो. हा चित्रपट खूप थ्रिलर आणि हॉरर आहे. 'भूतकालम' चित्रपट तुम्ही सोनी लिव्हवर तुम्ही पाहू शकता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
- फूंक : राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'फूंक' चित्रपटात सुदीप, अमृता खानविलकर, अहसास चन्ना, अश्विनी काळसेकर आणि इतर कलाकार आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या हॉरर चित्रपटाची कहाणी काळ्या जादूवर आधारित आहे. हा चित्रपट तुम्ही ओटीटीवर पाहू शकता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
- डिमॉन्टे कोलॉनी : या चित्रपटाची कहाणी चार मित्रांची आहे. हे चार मित्र एक दिवस दारूच्या नशेत वेडेपणा करायला जातात. हे चौघेही डी मॉन्टे कॉलनीत असलेल्या एका झपाटलेल्या बंगल्यात प्रवेश करतात. या बंगल्यामध्ये दुष्ट आत्मा असतात. या बंगल्यात प्रवेश केल्यानंतर चार मित्रांसोबत घडलेल्या भयानक गोष्टींनी सर्वांनाच धक्क करून टाकणाऱ्या आहेत. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
404 एरर नोट फाउंड : प्रवल रमन दिग्दर्शित '404 एरर नोट फाउंड' या चित्रपटाची कहाणी एका खोलीपासून सुरू होते. या रुमचा नंबर 404 आहे. वैद्यकीय विद्यार्थी गौरव काही वर्षांपूर्वी याच खोलीत राहत असतो. रॅगिंगमुळे त्याचा या खोलीत मृत्यू होतो. यानंतर या रुमध्ये एक मुलगा राहण्यासाठी येतो. यामध्ये आधीच गौरवचा आत्मा असते. या रुममध्ये जसा हा नवीन विद्यार्थ्या प्रवेश करतो, त्यानंतर गोंधळ सुरू होतो. 2011मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट थ्रिलर आहे. या चित्रपटामध्ये इमाद शाह, निशिकांत कामत, राजवीर अरोरा, टिस्का चोप्रा आणि सतीश कौशिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
नैना : श्रीपाल मोरखिया दिग्दर्शित 'नैना' चित्रपट हा खूप हॉरर आहे. या चित्रपटामध्ये उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची कहाणी अशाच एका मुलीची आहे, जिनं कॉर्नियामध्ये प्रत्यारोपण केलंय. त्यानंतर तिला आत्मा दिसायला लागते. 'नैना' हा चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध आहे. 2005 कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या मार्चे डू फिल्म विभागात या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता. हा चित्रपट 2002 च्या हाँगकाँग-सिंगापूरच्या हॉरर चित्रपट 'द आय'चा रिमेक आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा :