ETV Bharat / entertainment

Jai Ganesha track from Ganpath : 'गणपथ'च्या 'जय गणेशा' ट्रॅकवर थिरकला टायगर श्रॉफ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 3:59 PM IST

Jai Ganesha track from Ganpath : टायगर श्रॉफ, क्रिती सॅनन आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'गणपथ'च्या नवीन ट्रॅकचे गुरुवारी लॉन्चिंग करण्यात आलं. जय गणेशा नावाचं गाणं हे एक आकर्षक भक्तिगीत आहे. या गाण्यामध्ये ढाल ताशांच्या तालावर टायगर श्रॉफ थिरकताना दिसतोय.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई - Jai Ganesha track from Ganpath : अभिनेता टायगर श्रॉफचा आगामी 'गणपथ' या सायन्स फिक्शन अ‍ॅक्शन चित्रपटाचं नवं गाणं रिलीज झालंय. 'जय गणेशा' असं शीर्षक असलेला हा म्यूझिक ट्रॅक भव्य आहे. यामध्ये प्रचंड उर्जेनं टायगर श्रॉफ थिरकताना दिसतोय. या गाण्यात एक अतिशय अपारंपरिक आवाज आहे, जो केवळ आध्यात्मिक उत्कंठा वाढवतो असं नाही तर गायन म्हणूनही मंत्रमुग्ध करणारा आहे. कोरससह गाणे खूपच आकर्षक झालंय. पारंपारिक भक्ती संगीतामध्ये आधुनिक आणि लोक संगीतांचं मिश्रण गाण्यात जमून आलंय. नुकत्याच पार पडलेल्या गणेश उत्सवादरम्यान या गाण्याचा ऑडिओ रिलीज करण्यात आला होता, ज्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या गाण्याचं दृष्य रुप खूप भव्य आणि नेत्रदीपक आहे. वक्रतुंड महाकायच्या गजरात, ढोल ताशांचा साथीनं सार्वजिक गणेश उत्सवाच्या मंडपात टायगर श्रॉफचं आगमन होत. आकर्षक शरीरसौष्ठव असलेला टायगर उंच उडी मारत गणेश मूर्तीवरील पडदा हटवतो आणि 'जय गणेशा'च्या तालावर सर्वजण ताल धरताना दिसतात. विशाल मिश्रा यांनी या गाण्याला संगितबद्ध केलं असून त्यानंच हे गीत गायलंही आहे. अक्षय त्रिपाठीनं या गाण्याची रचना केलीय. राहुल शेट्टी आणि त्याच्या डान्सर्स टीमनं या गाण्याची सुंदर कोरिओग्राफी केलीय.

अलिकडंच 'गणपथ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. यंदाच्या दसऱ्याच्या निमित्तानं 'गणपथ' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाची अगदी सुरुवातीपासूनच उत्तम चर्चा सर्व माध्यमातून सुरू आहे. ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. यामध्ये टायगर श्रॉफ टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन जबरदस्त अ‍ॅक्शन करताना पाहायला मिळत आहे. याशिवाय या ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चनची झलक देखील दाखविण्यात आली आहे. या चित्रपटाची कहाणी ही 2070 मध्ये सुरू होताना दाखवण्यात आलीय. या ट्रेलरमध्ये टायगरचे दोन रूप पाहायला मिळतंय. हा चित्रपट या दसऱ्याला म्हणजेच 20 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'गणपथ- ए हिरो इज बॉर्न' हा एक उत्कृष्ट हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन चित्रपट असणार आहे.

हेही वाचा -

1. Omg 2 : 'ओएमजी 2' छोट्या मुलांसाठी बनवल्याचा अक्षय कुमारचा दावा, पण 'ए' सर्टिफिकेमुळे फसला डाव

2. Amitabh Bachchan Thanks Fans : अमिताभ बच्चननं चाहत्यांचं मानलं आभार, म्हणाले, 'प्रेम आणि आपुलकीची ही परतफेड नाही'

3. Kartik Aaryan : कार्तिक आर्यननं 'चंदू चॅम्पियन' चित्रपटामधील फोटो केला शेअर; संधी दिल्याबद्दल दिग्दर्शकाचे मानले आभार...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.