ETV Bharat / entertainment

Tiger Shroff : दिशा पटानीनंतर कोण आहे टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड? - टाइगर श्रॉफ

दिशा पटानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर टायगर श्रॉफ दुसऱ्या कुणाला डेट करत आहे का? हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Tiger Shroff
टायगर श्रॉफ
author img

By

Published : Aug 10, 2023, 5:58 PM IST

मुंबई : गेल्या वर्षी जुलैमध्ये बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या ब्रेकअपच्या बातम्या मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्या होत्या. टायगर आणि दिशा कधीच त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलले नाही आणि त्यांनी कधी ब्रेकअपवरच्या अफवांवर भाष्य केले नाही. दरम्यान गेल्या वर्षी, करण जोहरच्या चॅट शो - कॉफी विथ करणमध्ये, टायगरने दावा केला होता की तो त्यावेळी सिंगल होता. अलीकडेच एप्रिलमध्ये टायगर आणि दिशा एका इव्हेंटमध्ये एकत्र दिसले होते, त्यानंतर या दोघांचे पॅचअप झाले असेल, अशी चर्चा सुरू झाली होती.

टायगर श्रॉफची नवीन गर्लफ्रेंड? : मीडिया रिपोर्टनुसार टायगर आणि दिशा त्यांच्यात ब्रेकअपनंतरही चांगली मैत्री आहे. दरम्यान टायगर हा सिंगल नाही तो दीड वर्षांहून अधिक काळापासून एका मुलीला डेट करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे या मुलीचे नाव देखील दिशा आहे. टायगर श्रॉफच्या नवीन गर्लफ्रेंडचे नाव दिशा धनुका आहे आणि ती एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये वरिष्ठ पदावर काम करते. दिशा पटानीपासून वेगळे झाल्यानंतर टायगरने दिशाला डेट करायला सुरुवात केली.

टायगरची गर्लफ्रेंड कुटुंबालाही आवडते : टायगर हा जवळपास दीड वर्षांपासून दिशा धनुकाला डेट करत आहे. अनेकदा दोघे एकत्र दिसतात. टायगरच्या कुटुंबालाही दिशा आवडते. याशिवाय त्यांच्या नात्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. एका मुलाखतीत टायगरशी याबद्दल विचारले गेले असता त्याने म्हटले, 'मला वाटले काही महिन्यांपूर्वीच तुम्ही मला दुसऱ्या कोणाशी तरी जोडत आहात, पण असे काही नाही. मी सिंगलच आहे. यापूर्वी देखील टायगरने दिशा पटानीसोबत तो रिलेशनशिपमध्ये आहे हे सांगितले नव्हते, त्यामुळे आता असाच अंदाज बाळगला जात आहे की. तो दिशा धनुकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

टायगर श्रॉफचा वर्क फ्रंट : टायगर रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे. या चित्रपटात तो पोलीसच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अक्षय कुमारसोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि क्रिती सेननसोबत 'गणपथ'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Dhanush catches Jailer FDFS : धनुषने पाहिला 'जेलर'चा पहिला शो, फॅन्सचा सोशल मीडियावर जल्लोष सुरू
  2. Thank You For Coming Movie : भूमी पेडणेकर आणि शहनाज गिल स्टारर 'थँक यू फॉर कमिंग'चे पोस्टर प्रदर्शित...
  3. Gadar 2 vs OMG 2: 'गदर २' आणि 'ओ माय गॉड २'मध्ये होणार बॉक्स ऑफिसवर टक्कर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.