मुंबई : अभिनेत्री इलियाना डिक्रूझ गेल्या काही दिवसापासून फार चर्चेत आहे. इलियाना ही गर्भवती असून ती बरेचदा तिचे फोटो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यासोबत शेअर करत असते. सध्याला ती मातृत्व स्वीकारण्यासाठी सज्ज झाली आहे. इलियाने एप्रिलमध्ये गर्भधारणेची घोषणा केली होती. त्यानंतर तिने अनेकदा सोशल मीडियावर बेबीबंपमधील फोटो शेअर केले होते. आता तिने तिच्या बाळाच्या वडिलांच्या ओळखीबद्दलचा एक फोटो शेअर केला आहे.
फोटोमध्ये कोण आहे व्यक्ती : या फोटोमध्ये इलियानासोबत कोण व्यक्ती आहे हे स्पष्ट दिसून येत नाही आहे. पोस्टमध्ये तिने तिच्या जोडीदारीची प्रशंसा करत म्हटले, 'लव्हली मॅन' आणि माझा 'रॉक' असे तिने लिहून यावर काही स्पष्टीकरण दिले नाही. तिच्या होणाऱ्या बाळाचा वडील कोण आहे, याबद्दल तिचे चाहते फार उत्सूक आहे. मात्र यावर इलियाना काही उघडपणे सांगितले नाही. इलियानाच्या नवीन पोस्टमध्ये सांगितले, की मातृत्वामुळे मिळणारा आनंद अनुभवण्यासाठी ती भाग्यवान आहे. तसेच ती कठीण दिवसाबद्दल देखील या पोस्टमध्ये बोलली आहे. इलियानाने या पोस्टमध्ये 'लव्हली मॅन' ची ओळख करून देत म्हटले, तिला कठीण दिवस जगण्यास हा व्यक्ती मदत करत आहे.
जोडीदाराची केली प्रशंसा : या पोस्टमध्ये तिने अश्रू, निराशा, स्वत: ची शंका आणि क्षुल्लक गोष्टीबद्दल रडणे' याबद्दल सांगितले आहे. इलियाना पुढे म्हटले, की तिच्या न जन्मलेल्या मुलाबद्दलचे प्रेम तिला तिची शांतता परत मिळविण्यात मदत करते. तिने या पोस्टमध्ये तिच्या जोडीदाराबद्दल प्रेम व्यक्त केले आहे. इलियानाने तिच्या जोडीदाराचा उल्लेख करून तिच्या पोस्टचा शेवट केला आहे. तिने या पोस्टमध्ये त्याचे नाव उघड केले नाही किंवा फोटोमध्येही त्याचा चेहरा स्पष्टपणे दर्शविला नाही. पण, तिचे शब्द असे सुचवतात की जेव्हा ती या 'लव्हली मॅन' सोबत असते तेव्हा 'सर्व काही तिला सोपे वाटते'. इलियाना ही कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या दोघांनी अद्याप त्यांचे नाते अधिकृत केले नाही.
वर्कफ्रंट : दरम्यान इलियानाच्या वर्कफ्रंट बोलायचे झाले तर ती शेवटचा कुकी गुलाटी-दिग्दर्शित आणि अजय देवगण-निर्मित 'द बिग बुल'मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अभिषेक बच्चनही मुख्य भूमिकेत होता. तसेच तिचा रणदीप हुड्डासोबत आगामी चित्रपट 'अनफेअर अँड लव्हली' हा येणार आहे. या चित्रपटाचे दिग्गदर्शन, बलविंदरसिंग जंजुआ यांनी केले आहे.
हेही वाचा :