मुंबई : बाहुबलीनंतर चित्रपटसृष्टीतील मोठा आणि प्रसिद्ध चेहरा प्रभास पुन्हा एकदा पडद्यावर झळकण्यासाठी आणि आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांवर जादू करण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे प्रभास कोणत्याही भूमिकेत इतका गुंतून जातो की तो प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडून जातो. अभिनेत्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलरच आज रिलीज झाला आहे. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये राघवच्या भूमिकेत प्रभास, लक्ष्मणच्या भूमिकेत सनी, जानकीमातेच्या भूमिकेत क्रिती सेनन तर बजरंगच्या भूमिकेत देवदत्त नागे हे कलाकार दिसत आहे. या ट्रेलरमध्ये लंकेशच्या भूमिकेत अभिनेता सैफ अली खानची एक झलक दिसली आहे.
अभिनयाचा जादू दाखणार प्रभास : अमरेंद्र बाहुबलीच्या भूमिकेनंतर प्रभास हा 'आदिपुरुष' या चित्रपटात प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी रूपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाचा जादू दाखणार हे नक्कीच. कारण ट्रेलरमध्ये सर्व कलाकारांच्या भूमिका या दमदार दिसत आहे. 'आदिपुरुष'च्या ट्रेलरमध्ये राघवच्या भूमिकेचा आनंद घेताना प्रभास दिसत आहे. सर्व कलाकांरानी आपल्या भूमिकेसाठी फार मेहनत घेतली आहे. तसेच राघवच्या या भूमिकेसाठी प्रभासने फार कठीन वर्कआउट केले शिवाय त्याने त्याच्या आहारात काही बदलही केले होते. या मोठ्या प्रोजेक्टसाठी प्रभासने फार मेहनत घेतली आणि अनेक नियमांचे काटेकोरपणे पालन केले.
'आदिपुरुष' या चित्रपटासाठी प्रभासने घेतला पौष्टिक आहार : मिळालेल्या माहितीनुसार, प्रभास आठवड्यातून सहा दिवस ट्रेनिंग घेतो आणि रोज वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्यायाम करतो. त्यात तो धावणे, सायकलिंग आणि पोहणे या गोष्टी करत असतो . याबरोबरच तो योगा आणि ध्यान करतो. प्रभास त्याच्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी उच्च-प्रथिने, कमी-कार्बोहायड्रेट आहारात घेतो शिवाय दिवसभर भरपूर पाणी पितो. यासोबतच चिकन, मासे, अंडी आणि लो फॅट डेअरी प्रोडक्ट्सचाही प्रभासच्या आहारात समावेश आहे. 'बाहुबली' तपकिरी तांदूळ, क्विनोआ आणि रताळे यांसारखे कार्बोहायड्रेट देखील घेतो. विशेष म्हणजे प्रभास दारू आणि गोड शरबत घेणे टाळतो. ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट थ्रीडी आणि आयमॅक्समध्येही प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर (१३ जून) न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फेस्टिव्हलमध्ये ७-१८ जून दरम्यान होणार आहे.