ETV Bharat / entertainment

Siddharth Anand deserves praise : सध्याचा हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्विवाद नंबर वन दिग्दर्शक म्हणजे सिद्धार्थ आनंद! - सिद्धार्थ आनंद

यंदाची सर्वाधिक कमाई पठाण या चित्रपटाची झाली. या चित्रपटाने 130 दशलक्ष युएस डॉलर्स इतकी कमाई करत बाहुबलीलाही मागे टाकले आहे. यामुळे सिद्धार्थ आनंद यांची दिग्दर्शक म्हणून पत वाढली आहे.

Siddharth Anand deserves praise
Siddharth Anand deserves praise
author img

By

Published : May 15, 2023, 1:32 PM IST

मुंबई - शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम अभिनित आणि सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण यावर्षी बॉक्स ऑफिसवर राज्य करणारा एकमेव चित्रपट ठरला आहे. त्याने 130 दशलक्ष युएस डॉलर्स कमावत कमाईत बाहुबलीलाही मागे टाकले आहे. नुकतेच या चित्रपटाने सिनेमागृहांत १०० दिवस पूर्ण केले. पहिला विकेंड च्या कलेक्शनवर अथवा एक दोन आठवडे चित्रपट चालला तर हल्ली तो हिट अथवा फ्लॉप ठरतो. त्यामुळे पठाण चे हे यश चित्रपटसृष्टीसाठी नेत्रदीपक आहे. अर्थात या चित्रपटाच्या यशामुळे शाहरुख चे चाहते खुश झाले असले तरी सिनेसृष्टीत सिद्धार्थ आनंद यांची दिग्दर्शक म्हणून पत वाढली आहे. सिद्धार्थ आनंद कौतुकास पात्र आहे कारण जवळपास सर्व चित्रपट तिकीटबारीवर कोसळत असताना त्यांनी एक सुपरहिट चित्रपट दिला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी प्रेक्षकांना थिएटर मध्ये येण्यासाठी उद्युक्त केलं.

याआधी वॉर सारखा ॲक्शन चित्रपट त्यांनी बनविला होता जो सुद्धा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. आता पठाण, जो सिनेमाच्या इतिहासातील सर्वकालीन सर्वात मोठा जागतिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे, हा चित्रपट सुद्धा उत्तम कमाई करणारा चित्रपट ठरल्याने त्यांची फिल्म इंडस्ट्रीमध्ये कॉलर टाईट झाली आहे. सध्या हिंदी चित्रपटात प्रतिष्ठित ५०० कोटी नेट कलेक्शन क्लबमध्ये केवळ दोन दिग्दर्शक आहेत आणि ते म्हणजे सिद्धार्थ आनंद आणि एस एस राजामौली.

Siddharth Anand deserves praise
सिद्धार्थ आनंद

चित्रपट थिएटर मध्ये रिलीज झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतो. शक्यतो अनेकजण चित्रपट ओटीटी वर पाहण्यास पसंती देतात कारण म्हणजे थिएटर मधील वाढत्या तिकिटांच्या किमती. तसेच घरात ऐसपैस बसून हवे ते खातपित चित्रपट बघायला बऱ्याच जणांना आवडते. आणि ही सवय लॉकलाऊन मध्ये बोकाळली असून ती सुटत नाहीये. असो. तर थिएटर मध्ये धूमधाम केल्यावर पठाण ओटीटी वर उपलब्ध झाला परंतु तरीही तो आजही काही चित्रपटगृहांत चालू असून त्याने १०० दिवसांची मजलही मारली आहे.

Siddharth Anand deserves praise
सिद्धार्थ आनंद

प्रत्येक चित्रपटात परिपूर्णता शोधणारा मी भुकेलेला दिग्दर्शक आहे असे सिद्धार्थ आनंद यांचे म्हणणे आहे. मी नेहमीच भारतीय चित्रपटांत यापूर्वी कधीही न दिसलेल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. वॉर पेक्षा पठाणमधील डिटेलिंग चांगले आहे आणि माझ्या पुढच्या चित्रपटांत ते अजूनही चांगले होईल याची मला खात्री आहे कारण माझा माझ्या कामावर भरोसा आहे. माझ्या भविष्यातील प्रकल्पांमध्ये प्रेक्षकांना अजूनही नाविन्यपूर्ण गोष्टी अनुभवायला मिळतील" असे सिद्धार्थ आनंद म्हणाला. त्याच्या अविश्वसनीय कामगिरीमुळे, सिद्धार्थ आनंद सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्विवाद नंबर वन दिग्दर्शक आहे.

हेही वाचा - Box Office 9th Day Collection : बॉक्स ऑफिसवर द केरळ स्टोरीची दमदार कामगिरी, अवघ्या नवव्या दिवशी 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.