ETV Bharat / entertainment

song Ek Phul from film TDM : 'टीडीएम' मधील 'एक फूल वाहतो सखे' गाणं झालं व्हायरल, प्रेमीयुगुलांच्या दिलाचा चुकतोय ठोका!

भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित टीडीएम हा नवा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रटातील एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे! हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. अस्सल गावरान रोमँटिक गीत असलेल्या या गाण्यावर प्रेक्षक खूश झाले असून हे गाणे आता व्हायरल झाले आहे.

author img

By

Published : Feb 8, 2023, 5:49 PM IST

Updated : Feb 9, 2023, 11:39 AM IST

'एक फूल वाहतो सखे' गाण्यातील दृष्य
'एक फूल वाहतो सखे' गाण्यातील दृष्य

मुंबई - आपल्या चित्रपटांमध्ये संगीत हा अविभाज्य भाग आहे. त्यातच आपल्या चित्रपटांत हमखास रोमँटिक गाणी असतात. फेब्रुवारी महिना प्रेमीयुगुलांसाठी खास मानला जातो. आता 'टीडीएम' मधील 'एक फुल' हे गाणं व्हायरल झालं असून प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवत आहे. प्रियंका बर्वे आणि ओमकारस्वरूप बागडेच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध झालंय 'एक फुल' हे गाणं गाजतंय.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

आजवर असे अनेक चित्रपट आहेत जे चित्रपटाच्या कथेसह चित्रपटातील गाण्यामुळे चर्चेत राहिलेत. अशातच भर घालत एक आगळावेगळा विषय घेऊन 'टीडीएम' हा चित्रपट रसिकांच्या भेटीस आहेत. या चित्रपटाची खासियत म्हणजे चित्रपटातील गाणी. नुकतंच चित्रपटातील 'एक फुल' हे बाहेर आल्यापासून त्याला संगीतप्रेमींचा भरघोस पाठिंबा मिळतोय. 'टीडीएम' चित्रपटातील 'एक फुल' या रोमँटिक गाण्याच्या संगीताची जबाबदारी संगीतकार रोहित नागभिडे यांनी सांभाळली आहे. तर गाण्याच्या ओळी डॉ. विनायक पवार यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. प्रसिद्ध पार्श्वगायिका प्रियंका बर्वे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने गाण्याला चारचाँद लावले आहेत. 'टीडीएम' चित्रपटातील नवोदित जोडगोळी अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदी हे या गाण्यावर थिरकलेले पाहायला मिळत आहेत. आता 'एक फुल' या गाण्याने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्यानंतर लवकरात लवकर चित्रपटातील इतर गाणी ठेका धरायला लावण्यास सज्ज होणार आहेत.

'एक फूल वाहतो सखे' गाण्यातील दृष्य
'एक फूल वाहतो सखे' गाण्यातील दृष्य

मराठी चित्रपटात गाणी मंत्रमुग्ध करतात हे काही नवे नाही. परंतु 'टीडीएम' मधील 'एक फूल वाहतो सखे' गाणे इतराहून वेगळे आहे. यात अस्सल गावरान रोमान्स ठासून भरलेला आहे. गाण्याची सुरुवात होते तेव्हा नायक ट्रॅक्टर घेऊन नायिकेला प्रभावित करण्यासाठी येतो, पहिल्या काही क्षणातच पाण्यातून जाणाऱ्या ट्रॅक्टरने नायिकेला ज्या प्रकारे चिंब भिजवले तो इरसाल रोमँटिकपणा यात सुंदर चित्रीत झाला आहे. गाण्यात ट्रॅक्टर चालवणारी नायिका आणि घोड्यावरुन आलेला तिचा प्रियकर हे दृष्यही अप्रतिम आहे.

'एक फूल वाहतो सखे' गाण्यातील दृष्य
'एक फूल वाहतो सखे' गाण्यातील दृष्य

'चित्राक्ष फिल्म्स' आणि 'स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी वाहिली आहे. 'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर एक आगळावेगळा विषय ते या चित्रपटातून मांडणार आहेत. 'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटातील गाणी तर आजही लोकांना भुरळ पाडतायत यातच आता भर घालत 'टीडीएम' चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

'एक फूल वाहतो सखे' गाण्यातील दृष्य
'एक फूल वाहतो सखे' गाण्यातील दृष्य

येत्या २८ एप्रिल २०२३ ला 'टीडीएम' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

हेही वाचा - Prabhas Kriti Sanon Engagement? : प्रभास व क्रिती सेनॉनची मालादीवमध्ये एंगेजमेंट? जाणून घ्या सत्य काय आहे!

Last Updated : Feb 9, 2023, 11:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.