मुंबई - Shivarayancha Chava poster : छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा शिवरायांचा 'छावा'च्या रिलीजचे काउंटडाऊन सुरू झालं आहे. अचाट धैर्याने आणि अजोड पराक्रमाने शत्रूला झुंजवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या साहसीबद्दलचा हा चित्रपट ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट हे प्रस्तुत करत आहे. या पराक्रमी योद्धयाचा अतुलनीय इतिहास उलगडून दाखवणारा छत्रपती संभाजी महाराजांवरील मराठीतला हा पहिला भव्य चित्रपट असणार आहे. शिवरायांचा 'छावा' चित्रपटाची वाट अनेकजण पाहात आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. दरम्यान 'छावा'मधील एक पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे.
पोस्टर रिलीज : रिलीज केलेल्या पोस्टरमध्ये बलदंड शरीरयष्टी, करडी नजर आणि जबरदस्त आत्मविश्वासासह छत्रपती संभाजी महाराज एका शक्तिशाली वाघासोबत झुंज देताना दिसत होत. पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेच शिवधनुष्य मराठमोळा अभिनेता भूषण पाटील उचलताना दिसेल. भूषण पाटीलनं या भूमिकेबाबत म्हटलं, ''स्वराज्यनिष्ठा, शौर्य, धैर्य अशा अनेक अंगाने स्वराज्याच्या संरक्षणासाठी संभाजीराजांनी स्वतः मरणांतिक यातना सहन करून, स्वराज्याला जीवनदान देणाऱ्या या महान पराक्रमी राजाची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.''
'छावा' चित्रपटाबद्दल : 'छावा' चित्रपटाची निर्मिती मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी केली आहेत. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली असून संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली आहे. या चित्रपटाला संगीत संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलंय तर, पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. 'शिवरायांचा छावा' चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी प्रियांका मयेकर यांनी सांभाळली आहे. याशिवाय चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए.फिल्म्स सांभाळत आहे. या चित्रपटाचे संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटाचं साउंड डिझाईन निखिल लांजेकर आणि कार्यकारी निर्माता प्रखर मोदी यांनी केलं आहेत. याशिवाय 'छावा' चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन विष्णु देवा आणि किरण बोरकर यांनी केलंय.
हेही वाचा :