ETV Bharat / entertainment

‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ च्या निर्मात्यांची पुढील पेशकश ‘वीर मुरारबाजी ...पुरंदरची युद्धगाथा’! - Veer Murarbaji

शिवकालीन चित्रपटांच्या मालिकेत अजून एका चित्रपटाची भर पडलीय. रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज होत आहे. नुकतीच या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित झाली. ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ चित्रपटाची घोषणा केली आहे.

‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ च्या निर्मात्यांची पुढील पेशकश ‘वीर मुरारबाजी

author img

By

Published : Jun 20, 2022, 11:54 AM IST

मुंबई - अलीकडच्या काळात ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षक-पाठिंबा मिळताना दिसतोय. त्यातल्या त्यात शिवकालीन चित्रपटांना काकणभर जास्तच. शिवकालीन चित्रपटांच्या मालिकेत अजून एका चित्रपटाची भर पडलीय. रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज होत आहे. नुकतीच या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित झाली. ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांची आहे.

“१६६५ च्या आषाढात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार असलेले मुरारबाजी देशपांडे निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले. आणि ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करुन सोडणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ हा चित्रपट आम्ही घेऊन येत आहोत”, असे निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “अधिकाधिक तरुणांपर्यंत स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास पोहचवायचा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘पावनखिंड’ सारखा वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ चित्रपटही भव्यदिव्य असेल.”

अठरापगड जाती-जमातीच्या शूर मावळ्यांना सोबत घेत शिवरायांनी जाज्वल्य इतिहास घडविला. सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात लढाया करणारे शूरवीर आणि पराक्रमी मावळे स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावण्यासाठी सदैव तयार असत. अशा पराक्रमी आणि निष्ठावंत मावळ्यांमध्ये रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. ‘वीर मुरारबाजी ...पुरंदरची युद्धगाथा’ या चित्रपटासंबंधित इतर घोषणा लवकरच करण्यात येणार आहेत.

स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा मराठी रुपेरी पडदयावर पुढच्या वर्षी १७ फेब्रुवारी २०२३ ला येण्यासाठी सज्ज होत आहे.

हेही वाचा - रजनीकांत आणि मोहनलालची एके काळची नायिका; ऐश्वर्या आता रस्त्यावर विकते साबण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.