मुंबई - अॅटली दिग्दर्शित शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. रेड चिलीज एन्टरटेन्मेंटच्या सोशल मीडियावर हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर पाहता क्षणीच चाहते प्रेमात पडल्याचे दिसत असून शाहरुखचा हा नवा अवतार प्रेक्षकांना भुरळ पाडणारा आहे.
-
An epic showdown awaits you all! Ready Ah? 🔥#JawanTrailer out now!#Jawan releasing worldwide on 7th September 2023, in Hindi, Tamil & Telugu. pic.twitter.com/V4h4fb213g
— Red Chillies Entertainment (@RedChilliesEnt) August 31, 2023 " '="" class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">An epic showdown awaits you all! Ready Ah? 🔥#JawanTrailer out now!#Jawan releasing worldwide on 7th September 2023, in Hindi, Tamil & Telugu. pic.twitter.com/V4h4fb213g
— Red Chillies Entertainment (@RedChilliesEnt) August 31, 2023An epic showdown awaits you all! Ready Ah? 🔥#JawanTrailer out now!#Jawan releasing worldwide on 7th September 2023, in Hindi, Tamil & Telugu. pic.twitter.com/V4h4fb213g
— Red Chillies Entertainment (@RedChilliesEnt) August 31, 2023
'एका राजा होता जो एका पाठोपाठ एक युद्ध हारत गेला. भुकेने आणि तहानेने जंगलात भटकत होता. खूप रागात चालला होता', अशा प्रकारच्या निवेदानाने ट्रेलर सुरू होतो आणि बंदुकीच्या ट्रीगरवर बोट ठेवलेला शाहरुख खान दिसतो. एका अनोख्या अवतारातील किंग खानचे दर्शन या ट्रेलरमध्ये आपल्याला दिसू लागते. 'पठाण' चित्रपटातून पुन्हा निर्माण केलेली अॅक्शन हिरोची प्रतिमा 'जवान'मध्ये आणखी उजळण्यात चित्रपट यशस्वी झाल्याचे ट्रेलरमध्ये दिसते.
'जवान' चित्रपटाच्या ट्रेलरमधून एकेक पात्रांचाही परिचय प्रेक्षकांना होता. शाहरुख खान हायजॅक केलेल्या ट्रेनमध्ये व्हिलनच्या अवतारात दिसतो तर विजय सेतुपती हा कालीच्या अवतारातील एक खतरनाक व्हिलेन असल्याचे दिसते. तो आपला परिचय जगातील सर्वश्रेष्ठ शस्त्रास्त्र डिलकर पैकी एक असल्याचे करुन देतो. एका प्रसंगात दीपिका पदुकोणही दिसते. तिचा आणि शाहरुखचा रोमँटिक अॅक्शन सीक्वेन्स जबरदस्त जुळून आलाय.
संकटाच्या प्रसंगात आपला जीव हजार वेळा धोक्यात घालण्याची तयारी असलेल्या 'जवान'च्या रुपात ट्रेलरच्या उत्तरार्धात शाहरुख खान दिसतो. देश विरोधी कारवाया करणाऱ्यांविरुद्ध उभा ठाकलेला 'जवान' शाहरुखने साकारला आहे. भरपूर टाळ्या आणि शिट्ट्या यांचा माहोल तयार होऊ शकतील असे जबरदस्त डायलॉग शाहरुखच्या तोंडी असलेले पाहायला मिळतात.
साऊथ स्टार नयनतारा या चित्रपटात एका जबरदस्त अॅक्शन अवतारात पाहायला मिळत आहे. शाहरुखची यामध्ये दुहेरी भूमिका करत असल्याचे दिसते. अभिनेत्री प्रियामणी आपल्या भूमिकेत उठून दिसत आहे. सुनिल ग्रोव्हरचीही भूमिका वेगळी आणि लक्ष वेधणारी आहे. एक रंजक कथा, उत्तम संवाद, नेत्रसुखद दृष्ये, सर्वश्रेष्ठ कलाकारांची फौज आणि अॅक्शन पॅक्ड ड्रामा असलेला लोकप्रिय चित्रपट बनवण्यात दिग्दर्शक अॅटली कुमार यशस्वी झाल्याचे जवानच्या ट्रेलरवरुन लक्षात येत आहे.
हेही वाचा -
२. Rajkummar Rao Birthday : प्रतिभेच्या जोरावर राजकुमार रावनं चित्रपटसृष्टीत कमावलं नाव....
३. SRK is icon of love for India : 'शाहरुख हा भारतावरील प्रेमाचा प्रतिक', म्हणत कमल हासनने केले कौतुक