ETV Bharat / entertainment

'सनफ्लॉवर 2'मध्ये सुनील ग्रोव्हरसोबत झळकणार 'द केरल स्टोरी' फेम अदा शर्मा - सुनील ग्रोवर

Sunflower 2 Cast : 'द केरल स्टोरी' अभिनेत्री अदा शर्मा तिच्या आगामी वेब सीरीज 'सनफ्लॉवर-2' मध्ये अभिनेता सुनील ग्रोव्हरसोबत पडद्यावर झळकणार आहे. ही वेब सीरीज झी5वर रिलीज होईल.

Sunflower 2 Cast
सनफ्लॉवर 2 कास्ट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2024, 10:15 AM IST

मुंबई - Sunflower 2 Cast: 'द केरल स्टोरी'मुळं प्रसिद्धी झोतात आलेली अदा शर्मा लवकरच नवीन प्रोजेक्टच्या तयारीत आहे. अ‍ॅक्शन आणि ड्रामानंतर ती आता कॉमेडी स्टाइलमध्ये दिसणार आहे. अदा 'सनफ्लॉवर सीझन 2'च्या टीममध्ये सामील झाली आहे. ती सुनील ग्रोव्हरसोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहे. या वेब सीरीजमध्ये दोघे दिसणार असल्यामुळे त्यांचे चाहते उत्सुक झाले आहेत. अदा शर्मानं 'सनफ्लॉवर सीझन 2' मध्ये काम करणार असल्याचं सांगताना म्हटलं, ''द केरल स्टोरी'मध्ये ड्रामा आणि 'कमांडो'मध्ये अ‍ॅक्शन केल्यानंतर मला कॉमेडी करण्याची इच्छा होती. ही भूमिका अशी आहे की, ज्याबद्दल सध्या फार काही सांगता येणार नाही. मात्र ही भूमिका एक आगळीवेगळी आणि धडकी भरवणारी असेल.''

सनफ्लॉवर सीझन 2 : अदानं पुढं सांगितलं की, ''सनफ्लॉवर सोसायटीमध्ये राहण्याऱ्या व्यक्तीचं आयुष्य उलथून टाकणारी वेब सीरीज आहे.'' याशिवाय विकास बहलनं सांगितलं की, ''सनफ्लॉवर' वेब सीरीजला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमामुळे मला खूप आनंद झाला आहे, सुनील ग्रोव्हरची सोनू सिंगची प्रेमळ आणि मजेदार व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडली आहे, ज्यानं वेब सीरीजसाठी एक मजबूत चाहता वर्ग तयार केला आहे, आता चाहते दुसऱ्या सीझनची देखील वाट पाहत आहेत.'' पुढं त्यांनी सांगितलं, मला आगामी दुसऱ्या सीझन हा थ्रिलर-रहस्य आणि नव्या उंचीवर घेऊन जायचा आहे.''

अदा शर्माचं वर्क फ्रंट : विकास बहल निर्मित आणि नवीन गुजराल दिग्दर्शित या वेब सीरीजमध्ये सुनील ग्रोव्हर मुख्य भूमिकेत आहे. सुनीलसोबतच आशिष विद्यार्थी, रणवीर शौरी, मुकुल चड्ढा आणि गिरीश कुलकर्णी यांच्यासह इतर स्टार्सही या वेब सीरीजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. दुसऱ्या सीझनची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ही वेब सीरीज झी5 प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, अदा शर्माच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर ती लवकरच 'बस्तर: द नक्सल स्टोरी'मध्ये दिसणार आहे. विपुल अमृतलाल शाह निर्मित आणि सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटात अदा शर्मा मुख्य भूमिकेत दिसेल.

हेही वाचा :

  1. 'सालार' सक्सेस पार्टीत प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन यांनी दिग्दर्शक प्रशांत नीलसोबत कापला केक
  2. आशियाई चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक रमेश सिप्पींचा 'एशियन कल्चर'पुरस्काराने होणार गौरव
  3. विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना फेब्रुवारीमध्ये करणार साखरपुडा?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.